अभिनेत्री जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत जुईने ‘सायली’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला आहे. सध्या ‘ठरलं तर मग’च्या सेटवर सायलीच्या मंगळागौरीची तयारी सुरु आहे. त्यामुळे आगामी काळाच मालिकेत काय ट्विस्ट येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘या’ खास व्यक्तीने गिफ्ट दिले होते पैंजण; म्हणाली, “आजवर एकाही मुलाने…”

मालिकेत सुरु असलेल्या मंगळागौर शूटिंगच्या निमित्ताने जुई गडकरीने इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी जुईला मालिकेतील कोणत्या भागाचं शूटिंग करणं सर्वात कठीण गेलं हा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “प्रत्येक सीनचं दडपण असतं, मी कोणताच सीन…चला होऊन जाईल असा विचार करून करत नाही. प्रत्येक सीनच्या मागे विशेष मेहनत असते.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर कोण जास्त रिटेक घेतं? अर्जुनने केला खुलासा, म्हणाला…

“मालिकेचा प्रत्येक भाग आणि सीन माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पण, माझ्यासाठी आतापर्यंत भावनिकदृष्ट्या दोन सीन्स जास्त महत्त्वाचे होते. ते म्हणजे, जेव्हा सायली कुसुमला जाऊन कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्याचं सांगते आणि दुसरा, जेव्हा पूर्णा आजी सायलीला स्वीकारतात तो क्षण भावनिकदृष्ट्या खूप कठीण होता.” असं उत्तर देत, येत्या काळात मंगळागौरीच्या भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं जुईने सांगितलं.

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात, काय आहे पतीचं नाव? जाणून घ्या

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच २०० एपिसोड्स पूर्ण झाले होते. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कित्येक महिने आघाडीवर आहे. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.