‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. नवनवे ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’आणि अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारले आहे. मालिकेत सध्या सायलीच्या मंगळागौरीच्या सीक्वेन्सचं शूटिंग सुरु आहे. याच निमित्ताने अमित भानुशालीने मीडियाशी संवाद साधत सेटवरचे काही किस्से सांगितले.

अमित भानुशालीला ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मालिकेच्या सेटवर खूप जास्त रिटेक कोणीही घेत नाही कारण, मालिकेतील सगळेच कलाकार दिग्गज आहेत, ते सगळे खूप चांगले आणि जुने कलाकार आहेत. त्यातल्या त्यात मी मराठी मनोरंजनसृष्टीत नवीन आहे. त्यामुळे मीच एक-दोन रिटेक इतरांपेक्षा जास्त घेतो.”

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

हेही वाचा : “मुंबईकरांसाठी नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं…”, प्रसाद ओकने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अमित भानुशाली पुढे म्हणाला, “मालिकेतील माझे सगळे सहकलाकार खूपच चांगले आहेत. कथेनुसार माझे आणि सायलीचे सगळ्यात जास्त एकत्र सीन्स असतात. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना सांभाळून घेतो. आता अनेक दिवस एकत्र काम केल्यामुळे सगळ्याच सहकलाकारांशी एक छान नातं तयार झालं आहे.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे लवकरच झळकणार हिंदी चित्रपटात, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे नुकतेच २०० एपिसोड्स पूर्ण झाले होते. पहिल्या दिवसापासून या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कित्येक महिने आघाडीवर आहे. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.