‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ‘कल्याणी’ या भूमिकेतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी ही आहे. सध्या तिचा मोठा चाहतावर्ग असलेला दिसून येतो. तिच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता एका मुलाखतीत जुई व तिच्या आई-वडिलांनी तिच्या लहानपणीचे किस्से सांगितले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाली अभिनेत्री?

‘लोकमत फिल्मी’ने काही दिवसांपूर्वी जुई गडकरी आणि तिच्या कुटुंबाबरोबर संवाद साधला. त्यावेळी अभिनेत्रीच्या आई-वडिलांना विचारले की, तिचे लहानपणीचे काही किस्से आहेत का, जे तिच्या चाहत्यांना माहीत नाहीत. यावर बोलताना जुईच्या वडिलांनी म्हटले, “तिने कधी त्रास दिला नाही. माझ्या शोमध्ये तिला गायला घेतलं आणि तिला विचारलं तू गाशील का? तर त्यावर ती हो म्हणाली. काय गाणार? तर लावणी गाणार म्हणाली. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही लावणी तिने न बघता चालीत म्हटली. जेव्हा पहिल्या कार्यक्रमाला तिने लावणी गायली तेव्हा दोन हजार लोक समोर बसली होती. खरं म्हटलं तर एवढ्या माणसांसमोर आम्हालासुद्धा घाम फुटायचा. आम्ही पहिला शो केलेला तेव्हा हात थरथरत होते. जेव्हा हिने लावणी गायला सुरुवात केली, तिला समोरून टीप यायला लागल्या. आलेली टीप ती खिशात टाकायची, पण गाणे पुढे चालू ठेवलं”, जेव्हा जुईने पहिल्यांदा स्टेजवर गाणं गायलं तेव्हा ती फक्त दुसरीत होती, असे अभिनेत्रीने म्हटले.

पुढे जुईच्या आईने म्हटले, “आम्ही ठाण्याला शॉपिंगला गेलो होतो. बाहुल्यांच्या दुकानात गेलो होतो. मला ती म्हटली की, मम्मा आपण ही बाहुली घेऊयात. तेव्हाच्या काळात ८०० ही किंमत खूप होती. मी तिला म्हटलं मीनू, आता नको नंतर घेऊयात आपण; तर मला हळूच सांगितलं की माझ्याकडे पैसे आहेत ना. तिने ते साठवले होते, त्याची बाहुली घेतली आम्ही.”

जुईच्या वडिलांनी तिच्याबद्दल बोलताना म्हटले, “मुळात तिने घरात कधी नुकसान नाही केलं. नाहीतर काही घरांत भिंती रंगवलेल्या असतात ना, तर तिने असे कधीच केले नाही.” जुईने म्हटले, “मी खूप चांगली पेटिंग आर्टिस्ट आहे, पण मी कधीच भिंतीवर पेंट केलं नाही. मला त्यांनी नेहमी ड्रॉइंग मटेरिअल आणून दिलं. त्यांनी मला सांगितलं की, करायचं आहे ना तुला, तू याच्यावर कर; इकडे तिकडे नाही करायचं. हल्ली जे सांगतात ना की करू द्या भिंतीवर, तर आमच्याकडे असं कधीच झालं नाही. पण, मी गुणी होते, नतद्रष्टपणा कधी केला नाही.”

जुईच्या वडिलांनी म्हटले, “फक्त तिने खाण्याच्या बाबतीत खूप त्रास दिला.” यावर सहमती दर्शवत जुईने म्हटले, “खूप रडवायचे मी, बाबा उदबत्ती घेऊन बसायचे. एक पोळी खायला एक तास लावायचे. तोंडात घास भरून ठेवलेला असायचा. मला आठवतंय आई माझ्यासमोर रडायची, जेव गं मीनू असं म्हणत असायची. मला असं वाटायचं की, मला नाही आवडत हे सगळं. मी का जेवू? मला फक्त फिश आवडायचे. भाजी वैगेरे दिली तर वाटायचं की काय आहे हे सगळं? मला बाकी काही आवडायचं नाही.”

कधी मारायची किंवा दमदाटी करायची वेळ आली नाही का? तर यावर जुईने म्हटले की नाही, मला आजपर्यंत आई-बाबांनी दोनदाच मारलंय. ३६ वर्षांमध्ये मी दोनवेळाच मार खाल्ला आहे. एकदा आई मला सेड (Said) चं स्पेलिंग शिकवत होती आणि मी त्याचा चुकीचा उच्चार करत होते, तर सतत मी मातीच खात होते. एका पॉइन्टला आई चिडलेली होती, तिने हात उगारल्यावर मी वाचवण्यासाठी माझा हात वर केला, तर माझ्या हातात पेन्सिल होती ती तिला लागली, त्यामुळे तिने धपाटा घातला होता. बाबांकडूनसुद्धा असाच काहीतरी वेडपटपणा केला होता, त्यावेळी छडीने फटका खाल्ला होता. त्या व्यक्तीरिक्त मी मार खाल्लेला नाही. मी हे खूप अभिमानाने सांगू शकते की, फटके न देतासुद्धा मुलं व्यवस्थित वाढतात. जुईच्या आईने म्हटले, “तिला एखादी गोष्ट समजून सांगितली की ती ऐकायची, म्हणून मी हल्ली आयांना सांगत असते की तुम्ही मारू नका, मुलांना समजाऊन सांगा, ऐकतात मुलं.”

हेही वाचा: “…माझा गैरसमज होता”, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “सेटवर आल्यावर ते…”

दरम्यान, सध्या जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायलीच्या भूमिकेत दिसत आहे. याबरोबरच जुई सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळेदेखील चर्चेत असते.