‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजे जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी ती करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेचा विषय असते. काही महिन्यांपूर्वी इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यावेळी जुईने दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. जीवनावश्यक वस्तू गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जुईने घेतली होती. यावेळी तिच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. अशाच प्रकारचा जुईचा एक व्हिडीओ पाहून सध्या कौतुक केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान बिग बॉस फेम सोनाली पाटीलला उद्भवते ‘ही’ समस्या; नेटकरी म्हणाले, “नजर…”

अभिनेत्री जुई गडकरीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने गेले १८ वर्ष करत असलेल्या एका उपक्रमाबद्दल माहिती देत आहे. दरवर्षी जुई पनवेल येथील नेरेगावातील शांतीवन आश्रमातून दिवाळीची सुरुवात करते. इथे आपल्या मित्र-मैत्रीणींबरोबर जाऊन ती दिवाळी साजरी करत असते. यंदाचं तिचं हे १९वं वर्ष आहे. हे आश्रम सजवून, रांगोळी काढून कृष्ठरोगाने ग्रस्त असलेले रुग्ण, निराधार आजी-आजोबा यांच्याबरोबर जुई दिवाळी साजरी करते. यासाठी ती दरवर्षी देणगी गोळा करत असते. याही वर्षी तिने देणगी गोळा करण्यासाठी सुरुवात केली आहे. यासंदर्भात तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…

हेही वाचा – अजूनही ‘जवान’ची क्रेझ; अभिनेता अजिंक्य राऊतचा शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “क्या बात है…”

जुई करत असलेल्या या कामाचं नेटकरी सध्या कौतुक करत आहेत. एक नेटकऱ्यानं लिहीलं, “जुई ताई…मी अजून तरी कोणी मराठी स्टार असं काही सामाजिक कार्य करतं आहे, असं ऐकलं नाही. तू खरंच खूप छान आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं, “सायली आम्हाला तुझा अभिमान आहे. माणसापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे, ते तू दाखवून दिलं.” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं, “तू किती छान काम करतेय. खरंच अभिमान वाटतोय की, जगात अजून तरी माणुसकी शिल्लक आहे. आपुलकी आहे. छान काम करते.”

हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ

दरम्यान, जुईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर ती ‘वर्तुळ’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. मग जुई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली. या पर्वात तिच्याबरोबर ‘पुढचं पाऊल’मधील सोहमच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता आस्ताद काळेसुद्धा झळकला होता. ‘बिग बॉस’ नंतर काही काळ्याच्या विश्रांतीने जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे जबरदस्त पुनरागमन केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag actress jui gadkari netizens praises pps
Show comments