Tharla Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आपले सासरेबुवा मधुभाऊंना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटल्यापासून अर्जुन-सायली आपआपल्या घरी राहतात. कारण, सुभेदार कुटुंबीयांनी सायलीला घराबाहेर काढलेलं असतं. तर, दुसरीकडे मधुभाऊंनी लेकीकडून अर्जुनच्या संपर्कात राहायचं नाही असं वचन घेतलेलं असतं. त्यामुळे आता मधुभाऊंचा गैरसमज दूर करण्यासाठी अर्जुन अनेक प्रयत्न करताना दिसतोय.

अर्जुनला त्याच्या सगळ्या प्लॅन्समध्ये कुसुम देखील साथ देत असते. कुसुम वेळोवेळी घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची कल्पना अर्जुनला आधीच देत असते. सायली राहत असलेल्या चाळीत आता लवकरच मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने अर्जुन बायकोच्या माहेरी जाणार आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट

हेही वाचा : Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

सायली राहत असलेल्या चाळीत संक्रांतीनिमित्त नवरा-बायकोमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा भरवलेली असते. यामध्ये अर्जुन-सायली सुद्धा जोडीने सहभागी होणार आहेत. दोघेही आनंदात असताना अचानक याठिकाणी मधुभाऊ येतात. सायलीला अर्जुनबरोबर पतंग उडवताना पाहून ते तिच्याकडे रागाने पाहतात आणि घरी चल असा इशारा करतात. “सायली बस्स झालं आता घरी चल” असं सांगत मधुभाऊ तिच्या हाताला धरून घराच्या दिशेने घेऊन जातात.

यावेळी आपल्या बायकोला अर्जुन पटकन अडवतो आणि तिला शब्द देतो. तो म्हणतो, “मिसेस सायली यावेळी आपल्यात अंतर होतं पण, पुढच्यावर्षी आपण जोडीने पतंग उडवू.” अर्जुनचा हा आत्मविश्वास पाहून मधुभाऊ सुद्धा चकीत झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर, सासऱ्यांशी जराही वाद न घालता, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मान्य करून अर्जुन त्यांचा आशीर्वाद घेतो.

हेही वाचा : तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…

हेही वाचा : सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

“मधुभाऊ आता आमच्या नात्यावरची संक्रात दूर करायला आता तुम्हीच आशीर्वाद द्या. तिळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला.” असं अर्जुन मधुभाऊंना सांगतो. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या १३ जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे. आता यानंतर मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader