Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड झाल्यावर सायलीला सुभेदार कुटुंबीय घराबाहेर हाकलून देतात. अर्जुन याप्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो पण, त्याचं कोणीही ऐकत नाही. अखेर दोघांनाही वेगळं केलं जातं. सायलीला मधुभाऊ आपल्या घरी राहण्यासाठी घेऊन जातात, तर कल्पना सुद्धा सुनेच्या सगळ्या वस्तू घराबाहेर काढा, तिची कोणतीही आठवण इथे नको असं ठणकावून सांगते.

कल्पना चैतन्यला सायलीच्या सामानाची बॅग तिला नेऊन दे, असं सांगते. चैतन्य सायलीच्या घरी जाणार हे ऐकून अर्जुन सुद्धा बायकोला भेटण्यासाठी घराबाहेर जातो. मात्र, इथे मधुभाऊ ‘पुन्हा कधीच अर्जुनला भेटणार नाही’ असं वचन सायलीकडून घेतात. त्यामुळे कुसुम अर्जुनला, ‘तुम्ही इथून निघून जा’ अशी विनंती करते. पण, तो काही केल्या बायकोला भेटून घरी जाणार असं सांगतो. इतक्यात मधुभाऊ येतात आणि अर्जुनचा पाणउतारा करतात. सायलीला हा सगळा प्रकार पाहून अश्रू अनावर होतात. आता लवकरच मधुभाऊ आश्रमाची केस अर्जुनकडून काढून घेऊन एका नव्या वकिलाला देणार आहेत. या गोष्टीला अर्जुनचा विरोध असतो. आता अर्जुन वकील बदलण्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणार की नाही? हे पाहणं ( Tharla Tar Mag ) महत्त्वाचं ठरणार आहे.

Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
marathi child artist Shraddha Ranade Wedding
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बालकलाकार अडकली लग्नबंधनात, ऐश्वर्या नारकरांसह केलेलं काम, पाहा फोटो
tharala tar mag sayali slaps priya watch promo
प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो
Premachi Goshta Fame Rajas Sule Got to married photos viral
शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 Fame Akshay Kelkar will get married and share first vlog with future wife
Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी

हेही वाचा : १० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”

अर्जुनने सायलीसमोर दिली प्रेमाची कबुली

अर्जुन आणि सायलीची एकमेकांशी नीट भेटही झालेली नसते. त्यामुळे आपल्या मनातल्या भावना अर्जुनला आपल्या बायकोसमोर व्यक्त करायच्या असतात. मालिकेत अखेर तो क्षण लवकरच येणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे. शहर सोडून निघालेल्या सायलीला एसटी स्टँडवर अर्जुन प्रपोज करणार आहे.

सायली बॅग घेऊन निघालेली असते, इतक्यात अर्जुन एसटी स्टँडवर येतो आणि माइकवर सर्वांसमोर म्हणतो, “मिसेस सायली… आज मला अख्ख्या जगासमोर सांगायचं आहे आय लव्ह यू मिसेस सायली.” अर्जुनने प्रेमाची कबुली दिल्यावर एसटी स्टँडवरचे सगळे लोक उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवून या जोडप्याचं कौतुक करू लागतात. हा प्रसंग पाहून सायलीच्या डोळ्यात देखील पाणी येतं. कुसुमही आनंदी झाल्याचं या प्रोमोमध्ये ( Tharla Tar Mag ) पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या नारकर यांची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला सोहळा, फोटो आले समोर

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेचा हा महाएपिसोड २९ डिसेंबरला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता प्रेमाची कबुली दिल्यावर अर्जुन-सायली एकत्र येणार की, त्यांच्या मार्गात आणखी काही अडथळे येणार हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Story img Loader