Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरुम ड्रामा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. वात्सल्य आश्रमावरचा स्टे हटवण्यात आला असून महिपत आता कोणत्याही क्षणी आश्रम पाडेल ही बातमी समल्यावर सायली प्रचंड अस्वस्थ झालेली असते. तिला बालपणापासूनची प्रत्येक गोष्ट आठवू लागते. अशातच मधुभाऊंच्या आठवणीत सायली भावुक होते. आश्रम पाडल्यावर तिकडच्या मुलांचं काय होईल, मधुभाऊंना मी कशी समोरी जाऊ असे सगळे विचार तिच्या डोक्यात सुरू असतात. मात्र, अर्जुन तिला धीर देतो.

अर्जुन महिपतच्या घरी जाऊन त्याला जाब विचारतो. तसेच आता कोर्टात ( Tharala Tar Mag ) भेटूयात असं त्याला सांगतो. यानंतर अर्जुन आणि महिपत कोर्टात आमनेसामने येतात. साक्षी आणि महिपत शिखरे यांना वात्सल्य आश्रमावरचा स्टे हटवण्यात येईल याची खात्री असते कारण, त्यांनी थेट न्यायाधीशांशी हातमिळवणी केलेली असते. अर्जुन सुरुवातीला आपली बाजू मांडतो. मात्र, महिपतने आधीच न्यायाधीशांना पैसे देऊन त्यांच्याशी हातमिळवणी केलेली असते. परिणामी, कोर्टाकडून वात्सल्य आश्रमावर स्टे हटवला जातो आणि आश्रम पाडण्यास परवानगी देखील देण्यात येते.

British doctor who tried killing mother partner with fake COVID jab
बनावट कोव्हिड लस वापरून हत्येचा प्रयत्न; ब्रिटीश डॉक्टरने आईच्या साथीदाराला संपवण्याचा प्रयत्न का केला? नेमकं प्रकरण काय?
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Ab De Villiers on Rohit Sharma
रोहित फाफ डू प्लेसिसच्या जागी RCB चे नेतृत्त्व करणार का? एबी डिव्हिलियर्सने विराटचा उल्लेख करत दिले उत्तर
Shivam Dube smart reply on Which Captain you like Rohit Sharma or MS Dhoni
Shivam Dube : रोहित की धोनी, कोण आहे आवडता कर्णधार? शिवम दुबेने चतुराईने दिलेल्या उत्तराचा VIDEO व्हायरल
IND vs BAN 1st T20 Match Updates in Marathi
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली कोणाकोणाला मिळणार संधी? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच
Virat Kohli Behind Babar Azam Pakistan Captaincy Resign Pak Media Reveals Inside Story
Babar Azam: विराट कोहलीमुळे बाबर आझमने कर्णधारपदाचा दिला राजीनामा? पाकिस्तानी पत्रकाराच्या पोस्टने चाहते आश्चर्यचकित
Mohammed Siraj Take Stunning Overhead Catch of Shakib Al Hasan IND vs BAN Kanpur Test Watch Video
IND vs BAN: मोहम्मद सिराजचा ‘जिम्नॅस्टिकवाला कॅच’, हवेत मागच्या बाजूला डाईव्ह करत टिपला अनपेक्षित झेल; पाहा VIDEO

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवीन घर! शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो, होतोय कौतुकाचा वर्षा

अर्जुन ऐनवेळी बाजी पालटणार

केसचा ( Tharala Tar Mag ) हा निकाल ऐकल्यावर सायली प्रचंड बिथरते, तर मधुभाऊंना मोठा धक्का बसतो. एवढ्यात अर्जुन न्यायाधीश आणि महिपतच्या कृतीकडे बारकाईने लक्ष देतो. तेव्हा त्याला नेमकं काय घडलंय याचा अंदाज येतो. शेवटी अर्जुन एक युक्ती लढवतो…तो कोर्टाकडे शेवटचा एक दिवस मागतो.

“आश्रमात खून झाल्याने तो लगेच तुम्ही पाडू शकत नाही. कायद्यानुसार आश्रम पाडल्यास तिथला मुख्य पुरावा नष्ट होईल… त्यामुळे मी एका दिवसात पुरावा शोधण्यासाठी अशा एका व्यक्तीला आश्रमात घेऊन जाणार ज्याला या आश्रमाचा कानाकोपरा माहिती आहे. ती व्यक्ती म्हणजे मधुभाऊंची लेक आणि माझी बायको मिसेस सायली अर्जुन सुभेदार.” असं अर्जुन कोर्टात सांगतो. अखेर अर्जुनला एका दिवसाची परवानगी देण्यात येते.

Tharala Tar Mag Promo
अर्जुन देणार सायलीला धीर ( Tharala Tar Mag Promo )

कोर्टाबाहेर आल्यावर अर्जुन महिपतला खुलं आव्हान देत म्हणतो, “जर्जला खिशात घालून मिळवलेली जागा…पण, उद्या दुपारी ३ वाजल्यानंतर परिस्थिती पूर्ण वेगळी असेल. जस्ट वेट अँड वॉच”

हेही वाचा : “लल्लाटी भंडार…”, गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! दोघांच्या एनर्जीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा व्हिडीओ

दरम्यान, आता अर्जुन २४ तासांत कोणता पुरावा शोधणार आणि हा तपास करताना सायलीला तिच्या भूतकाळातील घटना आठवतील का? हे पाहणं ( Tharala Tar Mag ) महत्त्वाचं ठरणार आहे.