संगीत, मस्ती अन् धिंगाणा यांचा मेळ असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करत असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहोचला आहे. फेब्रुवारी २०२३मध्ये या कार्यक्रमाच पहिलं पर्व बंद झाल्यामुळे प्रेक्षकांकडून हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनोखा आणि भन्नाट अशा ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्याच भागात दोन लोकप्रिय मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत. ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कलाकारांमध्ये सांगितिक लढत पाहायला मिळणार आहे. पण यादरम्यान अर्जुन सायलीला प्रपोज करताना दिसणार आहे. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ईशा केसकर नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकारही झळकणार, पाहा प्रोमो

या व्हिडीओत, अर्जुन सायलीबरोबर डान्स करत, खास कविता सादर करत तिला प्रपोज करताना पाहायला मिळत आहे. यावेळी अर्जुनने सायलीसाठी खास फुलपाखरू असलेली अंगठी आणली आहे. पण सायली ती अंगठी पाहून घाबरते. कारण सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीला फुलपाखरांचा फोबिया आहे. तिला फुलपाखरांची भयंकर भीती वाटते. त्यामुळे ती अंगठी घालताना घाबरताना दिसत आहे.

हेही वाचा – “आईचे दागिने, मैत्रिणीचे कपडे अन्…”, घराचा EMI भरण्यासाठी केतकी माटेगावकरने केली अशी बचत; म्हणाली…

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला कोणते जंक फूड्स आवडतात? जाणून घ्या…

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘आता होऊ दे धिंगाणा’चं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. हे पहिलं वहिलं पर्व चांगलंच लोकप्रिय ठरलं. या पहिल्या पर्वातील साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या सुपरहिट ठरल्या. त्यामुळे दुसऱ्या पर्वातही या फेऱ्या पाहायला मिळणार आहेत. दोन मालिकांच्या टीममधली सांगितिक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच. पण त्याबरोबर भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलगडणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag arjun propose to sayali on aata hou de dhingana season 2 pps
Show comments