Tharla Tar Mag Fame Actress Baby Shower Ceremony : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र सध्या घराघरांत लोकप्रिय झालेलं आहे. सायली, अर्जुन, प्रतिमा, प्रिया, कल्पना, चैतन्य, अस्मिता अशी मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. यापैकी अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबडेने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना गुडन्यूज दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोनिका आता खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच पती चिन्मय कुलकर्णीसह फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. एप्रिल २०२५ मध्ये हे जोडपं बाळाचं स्वागत करणार असल्याचं मोनिकाने सांगितलं होतं. आता नुकतंच अभिनेत्रीचं डोहाळेजेवण पार पडलं आहे.

हेही वाचा : ‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट

मोनिकाने डोहाळे जेवणासाठी खास तयारी केली होती. सुंदर अशी साडी, त्यावर फुलांचे दागिने, नाकात नथ, साडीवर ‘आई’ असं नाव लिहिलेला बॅच असा सुंदर लूक अभिनेत्रीने डोहाळे जेवणासाठी केला होता. मोनिकाच्या बेबी शॉवर लूकची पहिली झलक तिच्या मेकअप आर्टिस्टने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात अभिनेत्री म्हणते, “तुम्ही सगळे ‘ठरलं तर मग’मध्ये मला बघतच आहात. मी अस्मिता नावाची भूमिका करतेय. माझं खरं नाव मोनिका दबडे आहे. अस्मिता करताना मला छान मजा येते, तेव्हा ( मालिकेत काम करताना ) मी वेगळ्या रुपात असते. तसंच एक वेगळं रुप मला आज साईने ( मेकअप आर्टिस्ट ) दिलं आहे. आज माझं डोहाळेजेवण आहे, मला सातवा महिना लागला आहे. खूप छान वाटतंय” असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोनिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अभिनेत्री डोहाळेजेवणाचे फोटो केव्हा शेअर करणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा : जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”

दरम्यान, मोनिका साकारत असलेल्या पात्राबाबत सांगायचं झालं तर, ‘ठरलं तर मग’ मालिकेत ती अस्मिता हे नकारात्मक पात्र साकारत आहे. अस्मिता ही अर्जुनची सख्खी बहीण असते. सायली विरोधात ती कायम काही ना काही कुरापती करत असते. ही भूमिका नकारात्मक आहे. तरीही अस्मिताशिवाय सुभेदारांचं घर नेहमीच अपूर्ण वाटतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look and photo reveals sva 00