स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. टीआरपीमध्ये आघाडीवर असणारी ही मालिका आताच्या घडील एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाला सापडते, असा सीक्वेन्स सुरू आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

प्रिया अर्जुनच्या ऑफिसची चावी चोरून मध्यरात्री त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्जुन-सायलीच्या लग्नाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरी करते. याबाबत अर्जुनला आधीच शंका आलेली असते आणि म्हणूनच तो आणि सायलीदेखील मध्यरात्री ऑफिसमध्ये जातात. पण, दोघांच्या नकळत प्रिया ती फाईल गायब करते आणि सुभेदार कुटुंबाला याचं सत्य कळावं म्हणून रातोरात त्यांच्या घरी येऊन अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणते. फाईल बघताच अर्जुन आणि सायलीच्या पोटात गोळा येतो. सगळे फासे उलटे पडणार इतक्यात पूर्णा आजी प्रियाच्याच कानशि‍लात लगावते.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

हेही वाचा… विकी कौशलने कतरिना कैफच्या प्रेग्नेन्सीच्या अफवांवर सोडलं मौन; म्हणाला, “जेव्हा वेळ येईल…”

आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, “तुमचं म्हणणं पटतंय मला, पण आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार; तेवढी काळजी घेऊ ना आपण आणि आता शेवटचे काही दिवस उरलेत फक्त एकदा मधुभाऊ सुटले की मग… ” यावर सायली अर्जुनला विचारते, “की मग काय?”

हेही वाचा… …अन् जुई गडकरीवर आली पिस्तूल बाळगण्याची वेळ; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “मला जीवे मारण्याची…”

तर दुसर्‍या बाजूला प्रिया तिच्या खोलीत विचारात मग्न असताना कोणीतरी खिडकीतून चोरून तिला पाहत असतं. हे लक्षात येताच प्रिया खिडकीच्या दिशेने चालायला लागते आणि खिडकीचा पडदा उघडून बाहेर पाहते, तितक्यात तिच्या मागून एक माणूस येतो; त्याचा चेहरा मास्कने झाकलेला असतो. तो माणूस प्रियाचं तोंड उशीने झाकून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो.

हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…

दरम्यान, प्रियाला जीवे मारण्याचा प्रयत्न कोण करतंय? हा साक्षी आणि महिपतचा डाव असेल का? तसंच अर्जुन-सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहूनही पूर्णा आजीने प्रियाला का मारलं? या सगळ्याचा उलगडा येत्या भागांमध्ये होईल.

Story img Loader