स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. टीआरपीमध्ये आघाडीवर असणारी ही मालिका आताच्या घडील एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाला सापडते, असा सीक्वेन्स सुरू आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रिया अर्जुनच्या ऑफिसची चावी चोरून मध्यरात्री त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्जुन-सायलीच्या लग्नाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरी करते. याबाबत अर्जुनला आधीच शंका आलेली असते आणि म्हणूनच तो आणि सायलीदेखील मध्यरात्री ऑफिसमध्ये जातात. पण, दोघांच्या नकळत प्रिया ती फाईल गायब करते आणि सुभेदार कुटुंबाला याचं सत्य कळावं म्हणून रातोरात त्यांच्या घरी येऊन अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणते. फाईल बघताच अर्जुन आणि सायलीच्या पोटात गोळा येतो. सगळे फासे उलटे पडणार इतक्यात पूर्णा आजी प्रियाच्याच कानशिलात लगावते.
हेही वाचा… विकी कौशलने कतरिना कैफच्या प्रेग्नेन्सीच्या अफवांवर सोडलं मौन; म्हणाला, “जेव्हा वेळ येईल…”
आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, “तुमचं म्हणणं पटतंय मला, पण आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार; तेवढी काळजी घेऊ ना आपण आणि आता शेवटचे काही दिवस उरलेत फक्त एकदा मधुभाऊ सुटले की मग… ” यावर सायली अर्जुनला विचारते, “की मग काय?”
तर दुसर्या बाजूला प्रिया तिच्या खोलीत विचारात मग्न असताना कोणीतरी खिडकीतून चोरून तिला पाहत असतं. हे लक्षात येताच प्रिया खिडकीच्या दिशेने चालायला लागते आणि खिडकीचा पडदा उघडून बाहेर पाहते, तितक्यात तिच्या मागून एक माणूस येतो; त्याचा चेहरा मास्कने झाकलेला असतो. तो माणूस प्रियाचं तोंड उशीने झाकून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो.
हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…
दरम्यान, प्रियाला जीवे मारण्याचा प्रयत्न कोण करतंय? हा साक्षी आणि महिपतचा डाव असेल का? तसंच अर्जुन-सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहूनही पूर्णा आजीने प्रियाला का मारलं? या सगळ्याचा उलगडा येत्या भागांमध्ये होईल.