Tharla Tar Mag New Episode Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीला सुभेदार कुटुंबीयांनी घरातून हाकलून दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुनच्या वाढदिवशी अन्नपूर्णा निवासमध्ये जंगी सेलिब्रेशन पार पडणार असतं. पण, प्रिया याच दरम्यान मोठा डाव खेळते. सायली-अर्जुनच्या खोलीत जाऊन ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल शोधून काढते आणि संपूर्ण घराला सायली-अर्जुनचं लग्न खोटं असल्याचं सांगते. यामुळे कल्पनासह अन्य सुभेदार कुटुंबीयांना मोठा धक्का बसतो.

सायली-अर्जुनला याप्रकरणी जाब विचारला जातो. शेवटी कल्पना आपल्या सुनेला हाताला धरून घराबाहेर काढते. हे सगळं पाहून अर्जुन प्रचंड बिथरतो. तो कल्पनाला अडवण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. अगदी, सायली सुद्धा सासुसह संपूर्ण कुटुंबीयांची माफी मागत असते पण, प्रियाने चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समोर आणल्याने कोणीही ऐकून घेण्यास तयार नसतं. अगदी मधुभाऊ सुद्धा या दोघांच्या विरोधात जातात.

हेही वाचा : Video : ‘पुष्पा २’च्या ‘किसिक’ गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त अंदाज! मधुरा जोशीसह केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

सायली-अर्जुनची पुन्हा भेट होणार की नाही?

सायलीला घराबाहेर काढल्यावर मधुभाऊ तिथून आपल्या लेकीला घेऊन जातात. कुसुम सुद्धा याठिकाणी उपस्थित असते. हे सगळं झाल्यावर आता सायलीची एकही वस्तू सुभेदारांच्या घरात ठेवायची नाही असा निर्णय कल्पना घेते. विमलला सांगून ती सायलीचं सगळं सामान एका बॅगेत भरून घेते आणि चैतन्यला हे सामान तिच्या घरी नेऊन दे असं सांगते.

चैतन्य मधुभाऊंकडे जाणार हे ऐकल्यावर अर्जुन सुद्धा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जातोय, असं सांगून घरातून पळ काढतो. अर्जुन बायकोची भेट घेण्यासाठी मधुभाऊंकडे जातो.

दुसरीकडे, मधुभाऊंनी आधीच अर्जुनला भेटायचं नाही किंवा त्याच्याशी बोलायचं नाही असं वचन सायलीकडून घेतलेलं जातं. त्यामुळे अर्जुन दरवाजात येताच कुसुम दार उघडते, तर सायली कपाटाच्या मागे उभी राहून नवऱ्याचा आवाज ऐकून रडत असते.

हेही वाचा : Video : “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

कुसुम अर्जुनला, “निघून जा मधुभाऊ आले तर त्यांना आवडणार नाही” अशी विनंती करते. पण, अर्जुन ऐकून घेण्यास तयार नसतो. शेवटी घडायला नको तेच होतं, मधुभाऊ अर्जुनला दरवाजात आल्याचं पाहतात आणि त्याला सायलीला भेटण्याची तुला परवानगी नाही असं ठणकावून सांगतात. पण, अर्जुन “मी माझ्या बायकोला भेटणार, तिच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही.” यावर ठाम असतो. यावेळी अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं.

आता अर्जुन-सायलीची भेट होणार की नाही? सायली स्वत:हून समोर आल्यास ती मधुभाऊंना दिलेल्या वचनाप्रमाणे वागेल की नाही या गोष्टी मालिकेच्या ( Tharla Tar Mag ) आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Story img Loader