मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहोचली. या मालिकेत जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबर जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

सोशल मीडियावर जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते, निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान एका नव्या पोस्टमुळे जुई चांगलीच चर्चेत आली आहे. जुईने आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले “दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वत:ची सुधारणा केली. स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर खूप सकारात्मक बदल होतात. त्यामुळे आपली शक्ती कुठे लावायची हे नीट ठरवायला पाहिजे.”

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?

जुईची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, जुईने ही पोस्ट नेमकी कशासाठी कोणासाठी शेअर केली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा- ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या भूमिकेत! छोट्या पडद्यावर सुरू होणार नवीन मालिका, पाहा प्रोमो…

जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली कल्याणी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तसेच श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझविन सख्या रे या मालिकांमधील जुईची भूमिका चांगलीच गाजली. मालिकांव्यतरिक्त जुईने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे.

Story img Loader