Tharla Tar Mag Fame Actress : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीचा नव्याने संसार सुरू झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सायलीला सुभेदार कुटुंबीय लग्नानंतर घरात घेत नव्हते. मात्र, अर्जुनने बायकोला खंबीरपणे साथ देऊन तिचा गृहप्रवेश केला. यानंतर, लगेच अर्जुनची बहीण अस्मिता रागाने घरातून निघून जाते असं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तिच्या घराबाहेर जायचं कारण नवऱ्याबरोबरची परदेशवारी असं आहे.

अस्मिता हे पात्र परदेशात जात असल्याचं दाखवलं जातंय, यामागचं मुख्य कारण म्हणजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडे खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. तिने मालिकेतून काही महिन्यांसाठी ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या दहा वर्षानंतर मोनिका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. आज अभिनेत्री तिच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पती चिन्मय कुलकर्णीसाठी खास पोस्ट शेअर करत मोनिकाने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अस्मिता म्हणजेच मोनिका दबाडेची पोस्ट

लग्नाला १० वर्षे पूर्ण होऊन सुद्धा नवीन-नवीन लग्न झाल्यासारखं वाटतंय. याच कारण आपल्याबाबतीत एकच असू शकतं ते म्हणजे आपवी निखळ मैत्री! खरं तर, लग्नानंतर मैत्री आणखी घट्ट होण्यासाठी आपण आपला घेतलेला वेळ, वेगवेगळी परिस्थिती, शुन्यातून केलेली सुरुवात आणि काळाप्रमाणे बदलण्याची तयारी हे सगळं आहेच.पण, एकमेकांबद्दलचा आदर आणि कौतुक पण आहेच.

आता भूमिका बदलणार आहेत पण, मैत्री यापेक्षा घट्ट होईल याची गॅरंटी मात्र आहे .
Happy 10th Anniversary Mitra चिन्मय कुलकर्णी
फोटो १ :- लग्नबंधनात अडकलो .
फोटो २ :- माझी इन्स्टाग्रामवरची मित्राबरोबरची पहिली पोस्ट!

मोनिकाचा पती काय काम करतो?

दरम्यान, मालिकेतून ब्रेक घेण्याआधी ‘ठरलं तर मग’च्या टीमने सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण केलं होतं. यावेळी चिन्मय सुद्धा उपस्थित होता. डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

चिन्मय कुलकर्णीचं छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे. टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोजचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या एका Stand Up कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव’, ‘स्टार प्रवाह ढिंच्यॅक दिवाळी २०२३’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमांचं लिखाण चिन्मय कुलकर्णीने केलेलं आहे. यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला होता.

दरम्यान, लग्नाच्या १० व्या वाढदिवसानिमित्त मोनिका व चिन्मय यांच्यावर मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader