जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’, मराठी मालिकाविश्वात सध्या एक नंबरची मालिका आहे. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली-अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. तसेच मालिकेतील इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रिया, अस्मिता, कल्पना, पूर्णाआजी, साक्षी, चैतन्य, महिपत, रविराज मालिकेतील सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिका सुरू झाल्यापासून आजवर टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेत्री अंगात ताप घेऊन काम करत आहे.
‘ठरलं तर मग’मधील कलाकार हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मालिकेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ, फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्याच प्रमाणे आज सकाळी मालिकेतल्या एका अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. ज्यामधून तिने चाहत्यांना गुड मॉर्निंग करत आपल्या तब्येतची अपडेट दिली.
हेही वाचा – विमानाला १० तास उशीर झाल्याने अभिनेता रणवीर शौरीचा संताप, म्हणाला, “कंपनी विरोधात…”
‘ठरलं तर मग’ मालिकेतील ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता कुलकर्णी-दिघे म्हणजे अर्जुनची आई कल्पना. अभिनेत्री प्राजक्ता यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाल्या, “गुड मॉर्निंग. आज सातची शिफ्ट. साडे सहाचा कॉल टाइम. शार्प साडे सहाला पोहोचलेली आहे. थंडीचे दिवस आहेत, पण थंडी अजिबात नाही. अंग तापलंय. तरीपण काम करायला पाहिजे. असो, सगळ्यांना गुड मॉर्निंग.”
हेही वाचा – शिवाली परब-निमिष कुलकर्णी प्रेमात? अभिनेत्रीने फोटोंसह शेअर केलेलं ‘ते’ कॅप्शन पाहून चाहते म्हणाले…
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील ९० दशकातील प्राजक्ता कुलकर्णी-दिघे हा एक लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘धडाकेबाज’ चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती.