‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. मालिकेतील सायली, अर्जुन, अस्मिता, प्रिया, पूर्णाआजी, कल्पना अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. पण या मालिकेतील कलाकारांमध्ये एक असा चेहरा आहे, जो ९०च्या दशकातील लोकप्रिय चेहरा आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा या कलाकाराने उमटवला आहे. ही कलाकार म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे.
अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनची आई म्हणजेच कल्पना सुभेदार ही भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. नुकतंच प्राजक्ता यांच्या घरी नवा सदस्य आला आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
हेही वाचा – Video: उटणं लावून अभ्यंगस्नान, औक्षण अन्…; मायरा वायकुळची ‘अशी’ झाली दिवाळी पहाट
प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आलिशान मर्सिडीज खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं लिहीलं आहे की, “नवीन सदस्याचं आमच्या घरी स्वागत आहे.”
हेही वाचा – दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदेशाहीचं उद्योग जगतात पदार्पण; पंढरपुरात सुरू केलं पहिलं…
हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सलमान खानला मिठी मारणारी ऐश्वर्या राय-बच्चन नसून आहे तरी कोण? जाणून घ्या..
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, जुई गडकरी, प्रियांका तेंडोलकर, पल्लवी वैद्य, मोनिका दबडे अशा अनेक कलाकारांनी प्राजक्ता यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘धडाकेबाज’ चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती.