स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. नुकतेच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मालिकेतील कलाकारांनी सेलिब्रेशन केलं. मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. सायली-अर्जुनच्या जोडीनं तर प्रेक्षकांना भुरळच घातलीय. अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणारा अमित भानुशाली अनेकदा चर्चेत असतो.

अमित सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सेटवरील धम्माल, मस्ती, मजा तो रील्सद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करीत असतो. आता पुन्हा एकदा अमितनं एक मजेशीर रील शेअर केलीय. त्यावरून या अभिनेत्याला त्याचं भविष्य नक्कीच कळलं आहे. अमितनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमित घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत नानासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या प्रमोद पवार यांच्याबरोबर दिसतोय.

Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
grandpa providing copy to Grandchild During Exam Goes Viral
VIDEO : परीक्षा सुरू असताना नातवाला कॉपी पुरवत होते आजोबा, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
Beating of girlfriend by boyfriend on road
“त्याने आधी तिच्या कानाखाली मारली नंतर केस ओढले…” भररस्त्यात प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची मर्दांगी…”
A Father fights to save 9 years old daughter with a tiger shocking video goes viral on social Media
बाप तो बापच असतो! नऊ वर्षाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला बाप; VIDEO पाहून थरकाप उडेल
Meet Santoor Pappa
Video : संतूर पप्पा पाहिले का? लग्नाला २२ वर्षे झाली पण काका दिसताहेत अगदी तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा… ‘बिग बॉस-ओटीटी-३’ची प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी होणार शोचा पहिला भाग प्रदर्शित; जाणून घ्या कधी, कुठे व कसा पाहाल

व्हिडीओची सुरुवात होताच अमित प्रमोद पवारांना विचारतो, “पंडितजी, माझा हात बघून सांगा ना, माझ्या भविष्यात काय आहे?” त्यावर पंडित बनलेले प्रमोद पवार म्हणातात, “बेटा, जीवनाच्या सुरुवातीची ४० वर्षं खूप कष्ट भोगावे लागतील तुला.” मग अमित त्यांना विचारतो, “पंडितजी त्यानंतर काय?” तर त्यावर प्रमोद पवार म्हणाले, “त्यानंतर तुम्हाला याची सवय होईल.” हे ऐकताच त्याचे मित्र त्याच्यावर हसू लागतात.

अमितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. अमितच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करीत लिहिलं, “झकासच.” तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “भविष्य खूपच उज्ज्वल आहे तुझं.” अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करीत प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या मालिकेत काय घडतंय?

‘ठरलं तर मग’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नुकतेच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले. वटपौर्णिमेच्या विशेष भागात अर्जुनसाठी सायली उपवास करते आणि सात जन्म हाच नवरा हवा, अशी प्रार्थना करते. तर, सायलीसाठीही अर्जुन निर्जळी उपवास ठेवतो. सायली वडाची पूजा करताना जोरदार पाऊस येतो. त्या वेळीही अर्जुन तिच्या बाजूने उभा राहतो आणि दोघंही वडाची पूजा पूर्ण करतात. अशातच अर्जुनला चक्कर येते आणि चैतन्य सांगतो की, सायलीसाठी अर्जुनने निर्जळी उपवास ठेवला आहे. हे ऐकताच सायलीला आश्चर्य वाटतं. आता नेमकं पुढे काय घडेल हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.

हेही वाचा… २०१७ मध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल शाहिद कपूरच्या पत्नीला येतात अजूनही हेट कमेंट्स, मीरा राजपूत म्हणाली, “आपण चुका करतो आणि…”

दरम्यान, या मालिकेत अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही प्रमुख भूमिका साकारत आहे आणि जुई गडकरी सायलीच्या प्रमुख भूमिकेत झळकतेय. या मालिकेत प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, केतकी पालव या कलाकारांच्यादेखील निर्णायक भूमिका आहेत.

Story img Loader