अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मालिका’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दिवसेंदिवस या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. लवकरच सायलीला, तिच तन्वी आहे आणि तिची आई देखील या जगात आहे हे कळणार आहे. पण त्यापूर्वी सायलीची पहिली मंगळागौर पाहायला मिळणार आहे. मात्र यादरम्यान सायलीला म्हणजेच जुईला एका अभिनेत्रीची खूप आठवण येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

जुई सध्या सोशल मीडियावर मंगळागौरीसाठी केलेल्या लूकचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहे. पण या मंगळागौरी दरम्यान जुईला अभिनेत्री दिशा दानडेची खूप आठवण येत आहे. दिशा दानडे म्हणजे मालिकेतील कुसूम. जुईनं प्रिया म्हणजे प्रियांका तेंडोलकर आणि कल्पना म्हणजे प्राजक्ता कुलकर्णी या दोघींबरोबरचा पारंपारिक नऊवारीतला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. तसेच लिहिलं आहे की, “आमच्या तिघींना तुझी (दिशा दानडे) खूप आठवण येतेय.”

हेही वाचा – “जो भी होगा देखा जायेगा” म्हणत एव्हरग्रीन नारकर कपलनं नवा व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले…

हेही वाचा – “आई-बाबा दोघेही गेले…”; अभिनेते अजिंक्य देव यांची नवी पोस्ट, रमेश देव आणि सीमा देव यांचे जुने फोटो केले शेअर

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ या इन्स्टाग्राम पेजवर मालिकेच्या पुढील भागाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये घराची साफसफाई करताना झुरळ दिसल्यामुळे सायली आणि अस्मिची उडालेली तारांबळ पाहायला मिळतं आहे. त्यांचा आराडओरडा ऐकून घरातले सर्वजण बाहेर येतात. तेव्हा सायली आणि अस्मि झुरळाला घाबरून किचनच्या ओट्यावर चढतात. पण त्यांना कल्पना खाली उतरायला सांगते. तितक्यात पुन्हा झुरळ दिसत. यामुळे सायली घाबरते आणि थेट अर्जुनला जाऊन घट्ट मिठ्ठी मारते. यावेळी पूर्णा आजी त्यांच्या समोरच उभी असते. त्यामुळे आता यापुढे काय घडतं? पूर्णा आजी यावर काय रिअ‍ॅक्ट होते? हे येत्या भागात पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame jui gadkari missed disha danade pps