अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने मालिकेत साकारलेल्या सायली या पात्राला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. जुईची मालिका पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असून सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रक्ट लग्नाच्या कथेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर जुई तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिच्या आई-बाबांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुईच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
हेही वाचा : Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच तिच्या आई-वडिलांसह अल्ट्रा मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिच्या घरच्यांनी त्यांना आपल्या लेकीसाठी कसा जावई पाहिजे? याबद्दल सांगितलं. जुईचे बाबा म्हणाले, “तिने लग्न करावं ही आमची मनापासून इच्छा आहे. तिला मनासारखा जोडीदार मिळावा…जो जुईला सांभाळून घेणारा, महत्त्वाचं म्हणजे तिचं करिअर सांभाळणारा आणि तिचे मूड सांभाळणारा पाहिजे.”
हेही वाचा : “तू दूर का, अशी तू…”, ओंकार भोजनेची कविता ऐकून भर कार्यक्रमात नम्रता संभेराव झाली भावुक
जुईची आई पुढे म्हणाली, “जो मुलगा तिला पसंद तोच मला…ती जो निर्णय घेईल तो मान्य असेल.” अभिनेत्रीने आई-वडिलांच्या सांगण्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेद्वारे कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर आलेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई घराघरांत लोकप्रिय झाली.
हेही वाचा : “डिशमध्ये एवढी अनास्था…” मुक्ता बर्वेला पोह्यांचा आला वाईट अनुभव, संताप व्यक्त करत म्हणाली..
दरम्यान, जुईची सध्याची मालिका ‘ठरलं तर मग’बद्दल सांगायचं झालं, तर या मालिकेत प्रतिमाची एन्ट्री झाली असून तिने लेकीला वाचवण्यासाठी ‘ओ निगेटिव्ह’ रक्त डोनेट केलं आहे. आता पुढे मायलेकींची भेट केव्हा होणार? सुभेदार आणि रविराज किल्लेदारला प्रतिमा रुग्णालयात आल्याचं दिसणार का? या गोष्टी येत्या काही भागांमध्ये स्पष्ट होतील.