अभिनेत्री जुई गडकरी सध्या तिच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्रीची ही मालिका छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. यापूर्वी जुईच्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेला देखील प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळाला होता. ‘ठरलं तर मग’मुळे आज जुईला घराघरांत सायली अशी नवीन ओळख मिळाली आहे. मालिकेला मिळालेल्या भरघोस यशामुळे अभिनेत्रीने नुकतीच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी जुईने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

वैयक्तिक आयुष्यात जुईने मांसाहार खाणं बंद केलं आहे राजश्री मराठीच्या मुलाखतीत यामागील कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, “यामागे अनेक अध्यात्मिक कारणं आहे. आपण देवाचं काहीतरी करत असतो आणि त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ (नॉन व्हेज) खातो मला ही गोष्ट पटत नाही. त्यात मी भयंकर प्राणीप्रेमी आहे. माझ्या घरात खूप प्राणी आहेत त्यामुळे मांसाहारी पदार्थ खाताना मला त्रास व्हायचा.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : “मिसेस सायली माफ करा”, बायकोची समजूत काढण्यासाठी अर्जुनने बनवला खास प्लॅन, पाहा प्रोमो

जुई गडकरी पुढे म्हणाली, “एके दिवशी असंच मी ठरवून टाकलं…आपल्याला ज्या वयात कळत नव्हतं तेव्हा आपण खाल्लं ठिके…पण, आता कळू लागलंय आता नको. त्या दिवसापासून मी मांसाहारी पदार्थ खाणं सोडून दिलं. आता मी आयुष्यात परत मांसाहार करणार नाही. माझ्या आई-बाबांच्या घरी सगळे खातात. पण, जिथे मी आता राहते त्या घरात मांसाहारी पदार्थ आणायला माझी परवानगी नाही. आता आयुष्यभरासाठी नॉन व्हेज सोडलंय.”

हेही वाचा : “शेवटच्या क्षणापर्यंत ती म्हणत राहिली ‘तो तुला सोडून जाईल’,” सुप्रिया पाठक यांच्या प्रेमविवाहाला आईचा होता विरोध

“मध्यंतरी मी सोळा सोमवार केले होते. ते सोमवार करताना साधारण साडे पाच महिन्यांचा कालावधी गेला. त्यामुळे नॉन व्हेजपासून दूर राहणं मला फार अवघड गेलं नाही. मला देवाने खूप काही दिलंय. त्या तुलनेत मांसाहार सोडणं काहीच नाहीये.” असं जुई गडकरीने सांगितलं.

Story img Loader