‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. अशातच जुई लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. शिवाय तिच्या लग्नाच्या तारखेच्या खुलासा झाला आहे. पण आता या चर्चांवर जुई स्पष्टच बोलली आहे.
हेही वाचा – समुद्रात गाण्याचं शूटिंग करताना ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर घडली भयंकर घटना; व्हिडीओ आला समोर
‘हंच मीडिया’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना जुईचं खऱ्या आयुष्यात लग्न कधी होणार? याचा खुलासा अभिनेता अमित भानुशालीने केला होता. अमितला जुईच्या लग्नाची तारीख काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने २४ फेब्रुवारी २०२४ असं उत्तर दिलं होतं. पण, अमितने सांगितलेली तारीख दुरुस्त करत जुई म्हणाली, “अमित थोडासा चुकलाय कारण, लग्नाची तारीख ४ आहे… महिना फेब्रुवारीचं असेल. यंदा माझा व्हॅलेंटाईन डे जरा चांगला साजरा होणार आहे.” यामुळेच जुईचं लग्न ४ फेब्रुवारी २०२४ होणार ही चर्चा सर्वत्र होऊ लागली. पण आता अभिनेत्रीने स्पष्टच बोलून या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
हेही वाचा – “तुम्ही आता जागे झालात का?” ‘ताली’वरील ‘त्या’ ट्रोल कमेंटवर सुव्रत जोशी स्पष्टच बोलला; म्हणाला, “परदेशात…”
‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना जुई म्हणाली की, “असं काहीच नाही. आतापर्यंत जितक्या मालिकांमध्ये मी काम केलंय. त्या मालिकांमध्ये माझं लग्न ४ फेब्रुवारीला झालंय. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही मी ४ फेब्रुवारीलाच लग्न करणार असे सगळेजण चिडवतात. म्हणून अमितने त्या मुलाखतीत उत्तर दिलं. खरंतर मी ४ फेब्रुवारीला लग्न करणार नाहीये. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अनेकदा अफवांमुळे कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.”