अभिनेत्री जुई गडकरी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. जुईने या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. जुई अभिनेत्रीबरोबर एक उत्तम खवय्येही आहे. वेगवेगळे पदार्थ चाखायला तिला नेहमीच आवडतात. नुकतंच जुईने तिला कोणत्या पद्धतीचं जेवण आवडत याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- “सतत मृत्यूची भीती”, काश्मीरमध्ये गेलंय प्रसिद्ध अभिनेत्याचं बालपण; म्हणाला, “भर रस्त्यात गोळीबार…”
जुई म्हणाली, “थाळी जेवण मला खूप आवडतं. मुंबईतील नरीमन पॉईंटजवळची स्टेटसमधील थाळी मला खूप आवडते. भगतताराचंदची थाळीही मला आवडते. पुण्यात जनसेवा, स्वरुप, दुर्वांकूर, श्रेयसची थाळी आवडते. बाहशाही आवडतं पुण्यातलं वैशालीची थाळीही मला आवडते. पुण्यातले बरेच जॉईंटस आहेत जे मला खूप आवडतात. मुंबईतील मला चाट खूप आवडतो. कॅनन पावभाजी खूप मस्त आहे. आणि याच्याच बाजूला अण्णाचा डोसा स्टॉल आहे तिथले डोसे अप्रतिम असतात.”
काही दिवासांपूर्वी जुईने तिच्या एका स्वप्नाबाबत खुलासा केला होता. जुईला स्वत: मराठमोळं रेस्टॉरंट काढायचं आहे. जगभरात त्याच्या अनेक शाखा काढण्याची तिची इच्छा आहे. कारण भारताबाहेर गेल्यावर आपल्या मराठमोळं जेवण करण्याची इच्छा होते. त्यामुळे परदेशातही मराठमोळं रेस्टॉरंट काढण्याची तिची इच्छा आहे. जगभरात या रेस्टॉरंटची चेन काढण्याची तिची इच्छा आहे.