अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत तिने साकारलेली सोज्वळ, साधी सायली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यामुळे मालिका टीआरपीच्या यादीत देखील अव्वल स्थानावर आहे. अशातच मालिकेच्या सेटवरील जुईने एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Sindhutai Maazi Maai: ‘राज रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री झळकणार सिंधुताईंच्या भूमिकेत; पाहा मालिकेचा नवा प्रोमो

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मालिकेच्या सेटवरील गमतीशीर गोष्टी शेअर करत असते. काही तासांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दुपारी २ ते ४ च्या दरम्यान मालिकेतील कलाकार मंडळी काय करताना हे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

२ ते ४ वेळेत कलाकार मंडळी आपल्या सीनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला याच वेळेत जुई झोपलेली दिसत आहे. जुईचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून बऱ्याच चाहत्यांनी पुणेकर आहे वाटतं? असं विचारलं आहे.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘ठरलं तर मग’ मालिकेत गणेश विसर्जनादरम्यान सायलीवर हल्ला झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सायलीचे प्राण वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. सायलीला ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाची आवश्यकता आहे. परंतु, कोणाचाही रक्तगट सायलीच्या रक्तगटाशी जुळत नाहीये. पण अशा काळात सायलीची आई म्हणजे प्रतिमा तिला रक्त देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता हल्ल्यामुळे अर्जुन-सायलीच्या नात्याला कोणतं नवं वळण देईल? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Story img Loader