अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सतत नवनवीन येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका सर्व मालिकांमध्ये वरचढ ठरली आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील सायली-अर्जुन म्हणजे जुई आणि अमितची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस उतरली आहे. तसेच मालिकेतील इतर कलाकारांवर प्रेक्षक तितकंच प्रेम दर्शवत आहेत. अशातच सध्या सायलीचा नणंदेबरोबरचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘गदर २’च्या सक्सेस पार्टीत सलमान खानच्या घड्याळाने वेधलं लक्ष; किंमत वाचून व्हाल थक्क

सायली म्हणजे जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ‘ठरलं तर मग’च्या सेटवरील बीटीएस व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. नुकताच तिनं मालिकेतील नणंद अस्मिता म्हणजेच मोनिका दबडेबरोबरचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बादल बरसा बिजुरी’ या ट्रेंडिंग गाण्यावर दोघी डान्स करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरचं एका शब्दात केलं वर्णन; म्हणाली…

हेही वाचा – “…यामुळे सेटवर एका क्षणात शिवानी रांगोळेला येतं रडू” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम ऋषिकेश शेलारनं केली पोलखोल

जुई आणि मोनिकाचा हा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “मस्त केलंय.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “जुई मस्त अभिनय केला आहेस.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “पूर्णा आजी आली बघा.”

हेही वाचा – “…म्हणून माझ्या लग्नात दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख होता”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेनं सांगितला खऱ्या लग्नाचा किस्सा

दरम्यान, मालिकेच्या आगामी भागांमध्ये सायलीची पहिली मंगळागौर पाहायला मिळणार आहे. शिवाय या भागांमध्ये सायली आणि अर्जुनची जवळीच वाढताना दिसणार आहेत. तसेच नेमकी तन्वी कोण? याचा देखील खुलासा होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame jui gadkari share new video with on social media pps