‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच हनिमूनचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. यानिमित्ताने मालिकेची संपूर्ण टीम माथेरानाला गेली होती. ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या निसर्गरम्य माथेरानमध्ये जुईला काय अनुभव आला याबद्दल तिने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुईला माथेरानमध्ये शूटिंग करताना अनेक ठिकाणी पर्यटकांनी अस्वच्छ केलेला परिसर आढळला. रस्त्याच्या आजूबाजूला कचरा फेकण्यात आला होता. निसर्गरम्य ठिकाणाची झालेली ही दुरावस्था पाहून अभिनेत्रीने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “चांगले पर्यटक व्हा! चांगले नागरिक अन् सगळ्यात आधी चांगले माणूस व्हा! निसर्गाची काळजी घ्या…तरच निसर्ग आपली काळजी घेईल. रस्त्यावर जागोजागी मला असा कचरा आढळला. हे लोक कचरा पेट्यांमध्ये कचरा फेकू शकत नाहीत का? एवढ्या सुंदर जागेवर निर्माण झालेलं हे प्लास्टिकच साम्राज्य पाहून खरंच खूप दु:ख होतं. मित्रांनो! असा कचरा करण्याआधी यापुढे खरंच थोडातरी विचार करा.”

हेही वाचा : अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी गौतमी देशपांडे करायची नोकरी! दाखवली जुन्या ऑफिसची झलक; म्हणाली, “पाच वर्षांपूर्वी…”

“तसेच कचरा इतरत्र टाकणं थांबवता येत नसेल तर प्लिज आपल्या घरात तो आवश्य फेका आणि त्यातच रहा!” असं सांगत जुईने सर्व पर्यटकांची कानउघडणी केली आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं पहिलं घर! म्हणाला, “लहानपणापासून आम्ही…”

दरम्यान, जुई गडकरीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. “जुई तुझं अगदी बरोबर आहे”, “सुंदर व निसर्गरम्य ठिकाणी असा कचरा पाहून खरंच वाईट वाटतं”, “दुर्दैव आहे आपलं”, “हे करणारे सुशिक्षित अडाणी आहेत.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame jui gadkari shared angry post after seeing plastic garbage in matheran sva 00