सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. सर्व सामान्यांप्रमाणे मालिका विश्वातील कलाकार सुद्धा गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात. बऱ्याच मराठी मालिकांच्या सेटवर बाप्पाचं आगमन होतं. यंदा ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या सेटवर सुद्धा बाप्पाची मनोभावे आराधना केली जाणार आहे. मालिकेच्या शूटिंगची खास झलक अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
हेही वाचा : मराठमोळ्या प्राजक्ता कोळीने नेपाळी बॉयफ्रेंडसह गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्रीचा होणार नवरा?
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर बाप्पाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट केली आहे. तसेच मालिकेतील सर्व कलाकार मिळून बाप्पासाठी खास मोदक बनवत असल्याचं जुईने शेअर केलेल्या BTS व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत ‘सायली’ या पात्राची भूमिका साकारत आहे. मालिकेत अभिनेता अमित भानुशाली तिच्यासह प्रमुख भूमिकेत आहे.
हेही वाचा : चाकरमानी निघाले कोकणात, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “आपली संस्कृती…”
सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाच्या कथानकाने अल्पावधीतचं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. परंतु, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता प्रेक्षकांना सायली आणि अर्जुनच्या नव्या नात्याची सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे. खोट्या लग्नामुळे सायली हरतालिकेचा उपवास करण्यास नकार देते. उपवास धरला नाहीतर पूर्णा आजी आणि आई सायलीला ओरडणार याची अर्जुनला कल्पना असते. त्यामुळे आता अर्जुन बायकोचं मन कसं वळवणार? सायली उपवास धरणार की नाही? याची उत्तरं प्रेक्षकांना उद्याच्या भागात मिळतील.
हेही वाचा : “तुझ्या मामूवर एक उपकार कर”, सलमान खानची भाचीसाठी भावनिक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाला…

गणेशोत्सवाच्या तयारीचा आणि येत्या भागाचा प्रोमो अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेच्या रंजक कथानकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.