मराठी मालिकाविश्वातील आघाडीची आणि लाडकी सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं. या मालिकेत तिने साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. अशाच प्रकारे सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकत आहे. साधीभोळी, सोज्वळ अशी सायली जुईने साकारली असून ही देखील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे सध्या जुई गडकरी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच तिने भाऊबीज निमित्ताने एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलच्या भाऊबीज स्पेशल कार्यक्रमात जुई गडकरी आणि तिचा भाऊ गौरांग गडकरी सहभागी झाला होता. यावेळी दोघांनी बालपणीचे अनेक किस्से सांगितले. एकेदिवशी जुईने भावंडांबरोबर दुकानांमध्ये जाऊन चोऱ्या केल्या होत्या. याचा किस्सा ती स्वतः सांगत म्हणाली की, मी क्षितीज आणि हा. याची जी मोठी सख्खी बहीण आहे ती म्हणजे क्षितीज. एकेदिवशी दुकानांमध्ये जाऊ चोऱ्या करायचं असं आमचं ठरलं. तेव्हा ‘द ग्रेट रॉबरी’ नावाचा चित्रपट आला होता, त्यामुळे आम्हाला असं मनात आलं की, चोऱ्या करू या. कॉलनी समोरच काकूचं घर असल्यामुळे बाहेर जायचं कसं? कारण ती जाऊ देणार नाही. म्हणून आम्ही एक गटार शोधलं जे कोरड होतं. ते गटार कॉलनीच्या बाहेरपर्यंत जात होतं. तेव्हा गौरांग साडे तीन वर्षांचा होता, मी सात वर्षांची असेल आणि क्षितीज आठ वर्षांची होती. आम्ही ठरवलं गटातून जाऊन चोऱ्या करायच्या.

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’ पूर्ण करण्याची जबाबदारी घेणार ‘या’ दोन व्यक्ती; ‘असा’ रंगणार महाएपिसोड

“आम्ही त्या गटातून गेलो आणि थेट कॉलनीच्या बाहेर पडलो. त्यामुळे आम्हाला वॉचमन वगैरे कोणीच पाहिलं नव्हतं. मग आम्ही एका परिसरात गेलो आणि तिथे चोऱ्या करायला सुरुवात केली. गोळ्या, चॉकलेट, पेन्स, खायच्या गोड सिगारेट अशा अनेक गोष्टी चोरल्या. ज्या दुकानात जास्त गर्दी असायची तिथे आम्ही जायचो. आम्ही गौरांगला पुढे पाठवायचो. दुकानदाराचं लक्ष विचलित करायला त्याला सांगायचो,” असं अभिनेत्री म्हणाली.

त्यापुढे गौरांगने सांगितलं की, तो दुकानदारांना कसा त्याच्या बोलण्यात गुंतवणूक ठेवायचा. जुईचा भाऊ म्हणाला की, चित्र कलेच्या वह्या असतात त्या दुकानदार कधी पुढच्या बाजूला ठेवत नाहीत. त्या आतल्या बाजूला ठेवतात. मग मी चित्रकलेची वही घेण्याचा बहाणा करायचो आणि त्यांना माझ्या बोलण्यात गुंतवणूक ठेवायचो.

हेही वाचा – विजय सेतुपती व कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

त्यानंतर जुई म्हणाली, “मग आम्ही दोघी गोळ्या-चॉकलेट्स बरण्यामधून चोरायचो. अशाप्रकारे सर्व काही चोरल्यानंतर आम्ही त्याच कोरड्या गटारातून परत घरी गेलो. तोपर्यंत काकूची रडून हालत खराब झाली होती. तीन मुलं अचानक गायब कशी काय झाली? वॉचमन बघत नाही? कोणीच बघत नाही? ती कुठे गेली? आम्ही सस्पेंडर असलेले कपडे तिघांनी घातले होते. सगळ्या खिश्यांमध्ये चॉकलेट्स भरली होती. हे पाहिल्यानंतर तिघांना काकूने जाम फटकवलं. देवा समोर बसवलं आणि सांगितलं देवाला सांगा की, पुन्हा कधीच चोरी करणार नाही. मग आम्ही रडत रडत बोललो.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame jui gadkari stole with her siblings in her childhood pps
Show comments