‘ठरलं तर मग’ ही मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. कमी वेळातच या मालिकेनं प्रसिद्धी मिळवली. टीआरपीमधलं आपलं अव्वल स्थान टिकवून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतील जुईचं सायली हे पात्र लोकांना पसंत पडलंय.

जुई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि सेटवरील धम्माल, मजा-मस्ती ती प्रेक्षकांबरोबर शेअर करीत असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी अभिनयाव्यतिरिक्त जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करीत असते. जुईनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय; जो सध्या चर्चेत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा पत्नीबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले, “तुझीच बायको…”

सध्या ‘हीरामंडी-द डायमंड बाजार’ या वेब सीरिजची सगळ्यांना भुरळ पडलीय. त्यातील अनेक गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. या गाण्यातलंच एक गाणं म्हणजे ‘सकल बन’. या गाण्यावर इन्फ्लुएन्सर्ससह अनेक कलाकार थिरकले आहेत. आता याच गाण्यावर जुईनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसाठी जुईनं खास हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मिनिमल मेकअप, झुमके आणि सुंदर अशा हेअरस्टाईलमध्ये जुईचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

जुईनं याआधी या ड्रेसवर फोटोशूट केलं होतं आणि त्याचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले होते. आता जुईचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: साक्षीला होणार तुरुंगवास? अर्जुन-सायलीच्या मदतीने अखेर शिवानी देणार खरी साक्ष; पाहा प्रोमो

एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “जुईताई तू खूप छान दिसतेस.” तर दुसऱ्यानं, “महाराष्ट्राची क्रश”, अशी कमेंट केली. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “तू खूप क्यूट दिसतेस.” तर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करीत तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जुईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही तासांतच या व्हिडीओला ६८ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

दरम्यान, जुई गडकरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जुईनं याआधी ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या मालिकेतील जुईचं सायली हे पात्र घराघरांत पोहोचलंय.

Story img Loader