Tharla Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरांत लोकप्रिय झालं आहे. या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकरांनी काही दिवसांपूर्वी नवीन गाडी खरेदी करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता या मागोमाग आणखी एका अभिनेत्रीने सर्वांना गुडन्यूज दिली आहे. ती म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री मोनिका दबडे. मोनिका या मालिकेत अस्मिता हे अर्जुनच्या बहिणीचं पात्र साकारत आहे. ही भूमिका नकारात्मक आहे. तरीही अस्मिताशिवाय सुभेदारांचं घर नेहमीच अपूर्ण वाटतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अस्मिताची ( Tharla Tar Mag ) भूमिका साकारणारी मोनिका आता खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत याबाबतची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी लवकरच होणार आई बाबा होणार आहेत.

हेही वाचा : Aishwarya Narkar – “दोन्ही वर्षी पुरस्कार मिळाला नाही, थोडं हिरमुसल्यासारखं…”, ऐश्वर्या नारकरांनी हुकलेल्या अवॉर्डवर मांडलं मत, म्हणाल्या…

‘ठरलं तर मग’ फेम मोनिकाने दिली आनंदाची बातमी

मोनिका आणि चिन्मय यांनी हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट केलं आहे. याचे फोटो शेअर करत एप्रिल २०२५ मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं मोनिकाने सांगितलं आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. याशिवाय मोनिका युट्यूब vlogs देखील शेअर करत असते. त्यामुळे अभिनेत्रीचे सगळे फॉलोअर्स, मालिकेतील सहकलाकार आणि मनोरंजनविश्वातून सध्या तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्रीने आपल्या लग्नाचा ९ वा वाढदिवस साजरा केला होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ तिने युट्यूबवर देखील शेअर केला होता.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

दरम्यान, मोनिका आई ( Tharla Tar Mag ) होणार कळताच जुई गडकरी, ज्ञानदा रामतीर्थकर, अपूर्वा नेमळेकर, रेश्मा शिंदे, समृद्धी केळकर, अक्षया नाईक, अश्विनी कासार या अभिनेत्रींनी कमेंट्स तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame monika dabade announce pregnancy welcome baby after 9 years of marriage sva 00