‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील सायली, अर्जुन, अस्मिता, प्रिया, पूर्णाआजी, कल्पना अशी सगळी पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशातच या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे म्हणजेच कल्पना यांनी आईसाठी एक खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; अलीकडेच सुयश टिळकची मालिकेत झाली होती एंट्री

अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी आईबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहीलं, “आई, तू आम्हाला सोडून जाऊन पाच वर्षं झाली… आजचा दिवस आठवणं मला नकोसं वाटतं… आई, तू खुल्या मनाने तुझं प्रेम आम्हाला दिलंस… पण मी तुला नेहमीच गृहीत धरलं… तू माझ्यावर खूपदा ओरडली असशील, पण तू कधीच माझ्यावर रागावली नाहीस, तू माझ्यावर फक्त प्रेम करत राहिलीस… मला नेहमी प्रश्न पडतो की, तू इतकी मोठ्या मनाची आणि निर्मळ मनाची कशी काय असू शकतेस?… पण खरंतर तुला माहित आहे, जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा त्याची खरी जाणीव होते.”

हेही वाचा – लवकरच आई होणाऱ्या सई लोकूरला अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला सल्ला; म्हणाली…

“दुर्दैवाने तू इतकी पुढे निघून गेली आहेस की, मी तुझी माफीही मागू शकत नाही….ते म्हणतात ना देव सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. पण देवा, तू तिलाही आमच्यापासून दूर घेऊन गेलास…आई मला खात्री आहे की तू जिथे असशील तिथे तुझ्यावर प्रेम होईल….आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि जमलं तर मला माफ कर…. तुझी खूप आठवण येते,” असं प्राजक्ता यांनी लिहीलं आहे. प्राजक्ता यांच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; निलेश साबळे म्हणाले, “कायमस्वरुपी…”

हेही वाचा – चिरतरुण अभिनेते अशोक शिंदे यांचं डाएट माहितीये? जाणून घ्या

दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील ९० दशकातील प्राजक्ता कुलकर्णी दिघे हा एक लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘धडाकेबाज’ चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली. सध्या त्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत अर्जुनची आई म्हणजे कल्पना या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame prajakta kulkarni dighe share emotional post for mother pps
Show comments