‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) ही मालिका कायम टीआरपीमध्ये अव्वल येण्यामध्ये आणि या मालिकेला जास्तीत जास्त प्रेक्षक पसंती मिळण्यामागचं कारण म्हणजे मालिकेतील कलाकार घेत असलेली मेहनत. आपलं काम जास्तीत जास्त लोकांना आवडण्यासाठी मालिकेतील प्रत्येक कलाकार मेहनत घेत असतो. अशीच एक मेहनत घेणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (Jui Gadkari). जुई ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच मालिकेतील तिची सहकलाकार म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तेंडोलकरने (Priyanka Tendolkar) जुईचा एक फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये जुई एका सोफ्यावर थकून झोपली असल्याचे पाहायला मिळत आहे. थकून झोपलेल्या जुईचा फोटो प्रियंकाने तिचा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि या फोटोसह तिने असं म्हटलं आहे की, “खूप दिवस सतत काम करून थकलेलं बाळ झोपी गेलं”.
त्याचबरोबर प्रियंकाने या फोटोमध्ये जुईच्या आईला मेन्श्न करत तुमच्या मुलीचा अभिमान असल्याचेही म्हटलं आहे. प्रियंकाची हीच स्टोरी जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर रीशेअर केली आहे आणि यासह तिने “किमान कोणीतरी आहे” असं म्हटलं आहे. त्यामुळे एकूणच जुईच्या या फोटोमुळे मालिकेतील कलाकारांची मेहनत दिसून येत आहे. अशातच मालिकेत आता नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये सायली-अर्जुन शोधाशोध करत असताना एका व्यक्तीची एन्ट्री होते. त्यामुळे आता ही नवीन व्यक्ती नक्की कोण आहे? या व्यक्तीमुळे मालिकेत आता काय नवं वळण येणार? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे.
मालिकेची कथा, मालिकेतील कलाकार तसंच मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या आवडीची होत आहे. वाढत्या प्रेक्षकसंख्येमुळे मालिका दिवसेंदिवस यशाची शिखरे चढत आहे. या मालिकेने गेली दोन वर्ष टीआरपी मध्ये अव्वल स्थान धरून ठेवले होते. मराठी मालिकांमध्ये सर्वात जास्त पसंती या मालिकेला दिली गेली आहे.