‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्याची छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची सर्वाधिक आवडती मालिका आहे. या मालिकेतील सायली, अर्जुन, पूर्णाआजी, कल्पना, अस्मिता, प्रिया अशा सगळ्या पात्रांनी सगळ्यांच्या मनात घर निर्माण केलं आहे. नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवण्यात मालिकेचा यश आलं आहे. त्यामुळे मालिका टीआरपीच्या यादीत अजूनही प्रथम स्थानावर टिकून आहे. अशातच या मालिकेतील एका अभिनेत्रीने तिला एका लोकप्रिय मालिकेतून काढल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “राज ठाकरे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही” अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं वक्तव्य

‘ठरलं तर मग’मधील ही अभिनेत्री म्हणजे प्रियांका तेंडोलकर. प्रियांकाने ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रिया म्हणजे खोट्या तन्वीची भूमिका साकारली आहे. पण एकेकाळी तिला एका लोकप्रिय मालिकेतून काढण्यात आलं होतं. त्या मालिकेचं नावं होतं ‘साथ दे तू मला’. आशुतोष कुलकर्णी, सविता प्रभुणे, प्रिया मराठे, पियूष रानडे अशी अनेक कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेत प्रियांका प्रमुख भूमिकेत होती. पण अचानक तिला एकेदिवशी या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली होती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेसाठी ऑडिशन, पण…

नुकत्याच ‘स्टार मीडिया मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेल दिलेल्या मुलाखतील प्रियांकाने या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, “जेव्हा एक सुंदर आणि खूप चांगलं सुरू असलेलं चॅनेल आहे आणि त्यावर तेव्हा लीड (प्रमुख भूमिका) म्हणून मालिका मिळते. त्याच्यानंतर अचानक तुम्हाला सांगितलं जात उद्यापासून येऊ नका. तर अर्थात त्रास होतो. ती मालिका गेली आणि मी पुन्हा उभी देखील राहिली. आता आपण याच्यापलीकडे आपण काय करू शकतो? आपण आपलं १०० टक्के दिलं होतं. पण त्यांना नसेल वाटतं, तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचे पैसे आहेत. आपण ती गोष्ट थांबवू नाही शकतं, कायदेशीर पण नाही आणि अशी पण नाही.”

हेही वाचा – “त्यांचे आई-वडल आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…

पुढे प्रियांका म्हणाली, “पण मला कायम याचं वाईट वाटलं की, यामुळे माझ्या आई-बाबांना खूप गोष्टींना सामोर जावं लागलं. त्यांना मला रडताना बघावं लागलं. मी त्या मालिकेत असताना दररोज डबा वगैरे घेऊन शूटला जायचे आणि काही दिवसांत मी घरी बसले होते. ना आईला डबा बनवायचा होता, ना मला बाय म्हणायचं होतं. त्यात नातेवाईक, शेजारची लोकं सतत विचारायचे तिचं काय झालं? प्रत्येकाला माझे आई-वडील ती गोष्ट सांगणार का? त्यांना जो मानसिक त्रास झाला ना, याचा राग माझ्या कायम मनात राहिलं. हे त्यांच्याबरोबर चुकीचं झालं. माझ्याबरोबर झालं, ठीक आहे. पण माझे आई-बाबा तेव्हाही म्हणायचे, गेलं ना तर ठीक आहे. जाऊ देत. आता आपण नव्याने सुरुवात करू या. पण नशीबाने मी पुन्हा एकदा त्याच चॅनेलवरती काम करतेय. जेव्हा ‘ठरलं तर मग’ मालिकेचं वर्कशॉप होतं तेव्हा चॅनेलमधील मोनिका मॅम आहेत, त्यांनी मला येऊन म्हटलं होतं की, “बरं वाटतंय तू पुन्हा स्टार प्रवाहवर काम करतेय.” त्या एका वाक्याने माझी जी काही जखम होती, ती भरून निघाली. त्यांनी माझी माफी देखील मागितली होती.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag fame priyanka tendolkar suddenly she was fired from a popular marathi serial pps