मराठी मालिकाविश्वातील लाडकी अभिनेत्री जुई गडकरी ही नेहमी चर्चेत असते. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तिची सायली ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहेत. अशातच सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये तिने श्रेया घोषालाने गायलेली अंगाई गायली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – विराट कोहलीने केलं ४९वे वनडे शतक; अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “स्वतःच्या वाढदिवसाला…”
अभिनेत्री जुई गडकरीने ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील ‘राम राम’ ही अंगाई गाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही अंगाई मूळ श्रेया घोषाने गायली होती. जुईने अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे, “आज २ सीनची गॅप मिळाली. म्हणून थोडासा “मी टाईम”…काही गाणी ऐकूनच खूप शांत वाटतं… ही अंगाई त्यातलीच एक, रोज पॅकअप झाल्यावर घरी जाताना मी “मी वसंतराव” हा अल्बम ऐकते. हा चित्रपट उत्तम आहेच, पण यातल्या गाण्यांचं काय करायचं? एकाच अल्बममध्ये भावगीत, नाट्यगीत, ठुमरी, बैठकीची लावणी, गझल, शास्त्रीय बंदीशी, अंगाई अशी एक सो एक रचलेली गाणी आहेत… उत्तम योजना केली आहे..”
“‘राम राम’ ही अंगाई मला खूप जास्त आवडते. श्रेया घोषाल यांच्या गोड आवाजातली ही अंगाई मला गायचा मोह आवरला नाही आणि मी नेहमी म्हणते तसंच मला गायला आवडतं…मग सूर नीट लागो नं लागो, गाऊन छान वाटतं. राहुल देशपांडे आणि निपुण धर्माधिकारी तुम्हाला सलाम. तुम्ही एक मास्टर पीस तयार केला आहे, जो जीवनपट बनवताना अक्षरशः बेंच मार्क म्हणून ठेवता येईल,” असं जुईने लिहीलं आहे.
‘राम राम’ ही अंगाई गाऊन जुईने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. तिच्या आवाजाचं कलाकारसह चाहते कौतुक करत आहेत. अभिनेता अभिषेक रहाळकर आणि खुद्द ‘मी वसंतराव’ चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी जुईचं कौतुक केलं आहे.
तसेच एका चाहत्याने लिहीलं आहे, “लय भारी आवाज…आताच्या अनेक अभिनेत्री पाहिल्या, वेळ मिळाला की, डान्स, शॉपिंग करतात. पण तुम्ही खूप सर्वांपेक्षा सुखी समाधानी आणि आपली मराठी संस्कृती जपला.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहीलं आहे, “सूर कसा ही लागो किंवा न लागो मनापासून केलेली सेवा देवापर्यंत नक्की पोहोचते”