मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिनं मालिकेतील साकारलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिका देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील जुईनं तिला गाववाली का चिडवतात? याविषयी सांगितलं आहे.

हेही वाचा – Sindhutai Maazi Maai: छोट्या चिंधीने आतापर्यंतच्या प्रवासाचा व्हिडीओ केला शेअर; म्हणाली, “सिंधुताई यांच्यासारख्या…”

अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मालिकेच्या अपडेट, व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिला लग्नापासून ते तिच्या आवडत्या जंक फूड्सपर्यंतचे विविध प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तर जुईनं दिली.

हेही वाचा – Video: रवी जाधव यांचे भाऊ अजूनही चालवतात रिक्षा; ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मंचावर दिग्दर्शकांनी सांगितला किस्सा…

या सेशनमध्ये जुईला एका चाहत्याने विचारलं की, तुम्ही एवढं साध कसं राहता? खऱ्या आयुष्यात सुद्धा तुम्ही असंच साध राहता की स्टायलिश राहता? यावर जुई म्हणाली, “सगळे माझी याबाबतीत खूप चेष्टा करतात. पण मला खरच जमतं नाहीत नखरे करायला. मी जशी आहे तशीच राहू शकते. मी फक्त विचारांनी मॉर्डन आहे. बाकी एकदम (मला सगळे चिडवतात तशी) – ‘गाववाली'”

हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका ‘या’ मालिकेचा रिमेक?

हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यातच गुंडाळावी लागली ‘ही’ मालिका; अचानक घेतला प्रेक्षकांचा निरोप

दरम्यान, सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीवरील झालेल्या हल्ल्यानंतर अर्जुन-सायलीच्या नात्यामध्ये गोड वळणं आलं आहे. दोघांचं नातं आता आणखी दृढ होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर आता अर्जुन सायलीला बायको म्हणून स्वीकारण्यास तयार झाला आहे.

Story img Loader