मालिका आणि प्रेक्षक यांचं एक वेगळं नातं असतं. दररोजच्या मनोरंजनासाठी प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या मालिका आवर्जुन न चुकता पाहत असतात. मग हळूहळू मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातलं वाटू लागतं. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवतात. त्यामुळे मालिकेचा टीआरपी वाढतो आणि ती मालिका लोकप्रिय ठरते. मागील आठवड्यातील मालिकेचा टेलीव्हिजन टीआरपी समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ आणि ईशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत चुरस पाहायला मिळत आहे.

ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ही मालिका पहिल्याच आठवड्यात स्टार प्रवाहच्या जुन्या मालिकांना मागे टाकून टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर होती. आता मागील आठवड्याच्या आलेल्या टेलीव्हिजन टीआरपी यादीनुसार ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या दोन मालिकांमधील रेटिंगमध्ये किंचत फरक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – …म्हणून नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरची ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून एक्झिट, दोघांनी भावुक पोस्ट करत सांगितलं कारण…

‘मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर मागील आठवड्याची टेलीव्हिजन टीआरपी यादी शेअर केली आहे. ज्यामध्ये पहिल्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ मालिका आहे. या मालिकेचा ६.९ टीआरपी रेटिंग आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा टीआरपी रेटिंग ६.८ आहे. त्यामुळे येत्या काळात ईशा केसकरची मालिका जुईच्या मालिकेवर वरचढ ठरते का? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ‘या’ खास पाहुण्यांची हजेरी, ‘बिग बॉस’ फेम गायकाच्या गाण्यावर थिरकणार गोखले-कोळी कुटुंब

मागील आठवड्याच्या टेलीव्हिजनवरील टॉप १० मालिका

१) ठरलं तर मग
२) लक्ष्मीच्या पाऊलांनी
३) तुझेच मी गीत गात आहे
४) प्रेमाची गोष्ट
५) सुख म्हणजे नक्की काय असतं
६) आई कुठे काय करते
७) कुन्या राजाची गं तू राणी
८) आता होऊ दे धिंगाणा २
९) तुझेच मी गीत गात आहे – महाएपिसोड
१०) कुन्या राजाची गं तू राणी – महाएपिसोड

Story img Loader