‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनने पूर्णा आजीला प्रियाशी लग्न करेन असं वचन दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मालिकेत नुकताच प्रियाने नवीन डाव खेळलेला आहे. तिने सायलीविरोधात पूर्णा आजी आणि कल्पनाचे कान भरलेत. यामुळे, सुभेदार कुटुंबीय सर्वानुमते अर्जुन आणि प्रियाचं लवकरात लवकर लग्न लावून टाकायचं असा निर्णय घेतात. साहजिकच हा निर्णय अर्जुन अजिबात मान्य करत नाही. घरच्यांशी वाद घालून तो निघून जातो. पण, एवढ्यात पूर्णा आजीची प्रकृती बिघडते.

पूर्णा आजीची तब्येत बिघडल्याचं पाहून सर्वजण तिला तातडीने रुग्णालयात दाखल करतात. याठिकाणी आजी अर्जुनकडून ‘तन्वीबरोबर लग्न कर’ असं वचन घेते. प्रिया एवढे दिवस खोटी तन्वी बनून सुभेदारांच्या घरात वावरत असते आणि सगळे तिच्या गोड बोलण्याला भुलतात. अर्जुन आजीची प्रकृती पाहून तिला मनाविरुद्ध वचन देतो. एवढ्यात प्रतिमा आत्या रुग्णालयात येते. अर्जुनने पूर्णा आजीला लग्नाचं वचन दिलंय हे ऐकून तिला काहीसा धक्का बसतो. पण, अर्जुन हतबल झाल्याचं ती अचूकपणे हेरते. या सगळ्या गोष्टी सायलीपर्यंत पोहोचतात. ती भावुक होऊन तिथून निघून जाते.

tharla tar mag adwait kala enters in the show to help sayali in mehendi ceremony
लबाड प्रियासाठी शेणाची मेहंदी; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ‘हे’ दोन नवीन पाहुणे! सायलीला करणार ‘अशी’ मदत, पाहा प्रोमो
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
zee marathi paaru and lakshmi niwas mahasangam new twist
लग्न, गैरसमज अन् कारस्थान…; ‘झी मराठी’च्या दोन मालिकांचा महासंगम! आठवडाभर काय घडणार? वाचा…
zee marathi ankita walawalkar reveals her lovestory
“झी मराठीमुळेच आमचं जमलं…”, अंकिता-कुणालची पहिली भेट कुठे झाली? हर्षदा खानविलकरांना सांगितली लव्हस्टोरी, पाहा व्हिडीओ
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
Paaru And Lakshami Niwas
आदित्य-अनुष्काचा साखरपुडा होणार की जयंत-जान्हवीचे लग्न? एकाच पॅलेसवरून अहिल्यादेवी किर्लोस्कर व जयंत यांच्यात होणार वाद…
tharla tar mag sayali plans to re marry with arjun
‘ठरलं तर मग’ म्हणत सायलीचा नवा निश्चय! अर्जुन-प्रियाच्या लग्नाची बातमी पोहोचताच…; ‘या’ दिवशी असेल विशेष भाग, पाहा प्रोमो
Tharla Tar Mag New Promo
ठरलं तर मग : सायलीला विसरा…; पूर्णा आजीने घातला अर्जुन अन् प्रियाच्या लग्नाचा घाट, नातवाला म्हणाली…

चैतन्य घरी परतल्यावर या सगळ्या गोष्टी सायली वहिनींपर्यंत पोहोचल्याचं अर्जुनला सांगतो. बायकोच्या आठवणीत अर्जुन प्रचंड भावुक होऊन, उदास होऊन बसलेला असतो. यावेळी चैतन्य त्याला सायली वहिनींना फोन कर, त्यांना संपूर्ण परिस्थिती तुझ्या तोंडून सांग असा सल्ला मित्राला देतो. या दोघांचं संभाषण गुपचूप प्रिया ऐकते. पुढे, प्रिया चिडून सायलीशी वाद घालण्यासाठी जाणार आहे.

प्रिया सायलीला म्हणते, “तू डोक्यावर पडली आहे का गं? सायली तुझा घटस्फोट होणार आहे. कायद्याने तुमचं नातं आता संपलंय…फिनिश! आता कायद्याने अर्जुनची बायको मी होणारे” यावेळी सायली प्रियाला चोख उत्तर देत स्वत:ची बाजू स्पष्ट करणार आहे. ती म्हणते, “कायद्याने आमचा घटस्फोट होईल. पण, मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करेन. काहीही झालं तरी ते स्थान मी तुला मिळू देणार नाही.”

सायलीचं उत्तर ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आता मालिकेत पुढे काय घडणार? सायली अर्जुनशी लग्न कसं करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Story img Loader