छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मालिकेतील अनेक पात्र, कथानक प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटू लागतात. त्यामुळे मालिका आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं तयार झालेलं असतं. प्रेक्षक न चुकता मालिका दररोज पाहत असतात. म्हणून मालिकेचे निर्माते आणि लेखक नवनवीन ट्वीस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावरच मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. मागील आठवड्याचा टेलीव्हिजन टीआरपी समोर आला आहे. ज्यामध्ये ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेने जुन्या मालिकेना मागे टाकतं चांगलीच बाजी मारली आहे.
अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका २० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत ईशाने मुर्तीकार कला खरेची भूमिका साकारली आहे. तर अक्षय बिझनेस मॅन अद्वैत चांदेकरच्या भूमिकेत झळकला आहे. अवघ्या काही दिवसांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे टीआरपीच्या यादीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका जुन्या मालिकेवर वरचढ झालेली पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “…म्हणून अजूनपर्यंत मुलाला सोशल मीडियापासून ठेवलंय लांब”, शशांक केतकरने सांगितलं कारण, म्हणाला, “ऋग्वेद…”
‘मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर मागील आठवड्याची टेलीव्हिजन टीआरपी यादी शेअर केली आहे. ईशा आणि अक्षयने इन्स्टाग्राम स्टोरीवर हीच टेलीव्हिजन टीआरपीची यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ मालिका असून दुसऱ्या स्थानावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका आहे. यापूर्वी दुसऱ्या स्थानावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका असायची. पण आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आलेल्या कलाने चांगलीच बाजी मारली आहे. ही टीआरपीची यादी पाहता येत्या काळात जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ आणि ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्याच्या टेलीव्हिजन टॉप १० मालिका
१) ठरलं तर मग
२) लक्ष्मीच्या पाऊलांनी
३) तुझेच मी गीत गात आहे
४) प्रेमाची गोष्ट
५) आई कुठे काय करते
६) सुख म्हणजे नक्की काय असतं
७) कुन्या राजाची गं तू राणी
८) आता होऊ दे धिंगाणा २
९) ठिपक्यांची रांगोळी
१०) मुरांबा