Tharla Tar Mag New Year Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सुभेदारांचं घर सोडल्यापासून दोघांची एकमेकांशी नीट भेटही झालेली नाहीये. याशिवाय ‘अर्जुनला भेटायचं नाही, संपर्क ठेवायचा नाही’ असं वचन मधुभाऊंनी सायलीकडून घेतलेलं असतं. त्यामुळे आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाचं ती पालन करत असते.

एसटी स्टँडवर सर्व लोकांसमोर नवऱ्याने प्रपोज करून सुद्धा सायली मधुभाऊंचं वचन निभावत अर्जुनला काहीच उत्तर देत नाही. आपल्या प्रपोजलला काहीच उत्तर न देता सायली का निघून गेली? याचा विचार करून अर्जुनचं मन अस्वस्थ झालेलं असतं. त्याला काही करून सायलीला भेटायचं असतं.

Bigg Boss 18 Shilpa Shirodkar emotional after met daughter watch promo
Bigg Boss 18: ८६ दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पा शिरोडकर ढसाढसा रडली, किस करताच अनुष्का मराठीत म्हणाली, “मी मेकअप लावलाय…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
shweta mehendale
Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने नवीन वर्षाचे ‘असे’ केले स्वागत; रामशेज किल्ल्यावरून पतीसह दिल्या शुभेच्छा
abhishek bachchan express opinion with living family
अभिषेक बच्चनने लग्नानंतरही पालकांबरोबर राहण्याविषयी मांडले होते मत; म्हणाला, “माझ्या आईचा एक नियम…”
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”

सायलीशी पुन्हा संपर्क साधायचा असेल, तर सर्वात आधी मधुभाऊंची मनधरणी केली पाहिजे ही गोष्ट अर्जुनला माहिती असते. यामुळे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये अर्जुन मधुभाऊंची भेट घेणार आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं सर्वांसमोर फुटल्यापासून मधुभाऊ अर्जुनचा प्रचंड तिरस्कार करत असतात आणि यामुळेच त्यांनी सायलीला सुद्धा अर्जुनला भेटण्यास मनाई केलेली असते.

हेही वाचा : सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवा व्यवसाय! तृप्तीने अलिबागमध्ये सुरू केला सुंदर Homestay; अभिनेता म्हणाला, “तुझं स्वप्न…”

…तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या

अर्जुन आता आगामी भागांमध्ये ( Tharla Tar Mag ) मधुभाऊंची मनधरणी करताना दिसेल. नव्या प्रोमोमध्ये तो त्यांच्या मागे-मागे चालताना, ‘प्लीज माझं ऐका मधुभाऊ’ असं म्हणताना दिसतोय. पण, त्याचे सासरे काही केल्या त्याचं काहीच ऐकून घेण्यास तयार नसतात. सायलीला भेटण्यासाठी घरापर्यंत आलेल्या अर्जुनच्या तोंडावर मधुभाऊ घराचं दार बंद करुन घेतात.

मधुभाऊ अर्जुनला रागात म्हणतात, “माझ्या सायलीवर तुझी सावली सुद्धा पडायला नको.” पुढे ते जावयाच्या तोंडावर घराचं दार बंद करुन घेतात. पण, अर्जुन दारावर हात मारून पुन्हा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, “एक दिवस तुम्ही स्वत:हून हा दरवाजा उघडाल आणि तुमच्या मुलीचा हात विश्वासाने माझ्या हातात द्याल. तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या…” अर्जुनचा हा निर्धार ऐकून मधुभाऊ त्याला ‘निघ’ म्हणत त्याची हाकलपट्टी करतात.

हेही वाचा : Bigg Boss 18: पत्नीला पाहताच विवियन डिसेनाचे अश्रू अनावर; दोघांचा रोमँटिक प्रोमो पाहून निक्की तांबोळी म्हणाली…

नवऱ्याचा निर्धार ऐकून सायली अश्रू अनावर होतात. भेट झाली नसल्याचं दु:ख असूनही अर्जुनने केलेल्या निश्चयाचं तिला प्रचंड कौतुक वाटतं. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेचा हा विशेष भाग प्रेक्षकांना ४ जानेवारी रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.

Story img Loader