Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या महिपतने वात्सल्य आश्रम पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. थेट न्यायाधीशांशी हातमिळवणी करून महिपत-साक्षीने मोठी खेळी खेळली आहे. यामुळे कोर्टाने वात्सल्य आश्रमावरची स्टे ऑर्डर हटवून ही वास्तू पाडण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाचा हा निर्णय ऐकून सायली आणि मधुभाऊ प्रचंड बिथरतात. दोघांनाही मोठा धक्का बसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुन यानंतर मोठ्या हुशारीने आश्रमात जाऊन पुरावा शोधण्यासाठी कोर्टाकडून एक दिवस मागून घेतो. यादरम्यान त्यांना नामांकित कपड्यांच्या ब्रँडचा एक टॅग सापडतो. एवढे महाग कपडे केवळ साक्षी वापरते असा अंदाज चैतन्य व्यक्त करतो. यामुळे अर्जुनला केससंदर्भात मोठा पुरावा मिळतो. मात्र, तो टॅग साक्षीच्याच ड्रेसचा आहे हे सिद्ध करण्यासाठी अर्जुनकडे काहीच पुरावा नसतो. अशातच महिपतने आधीच कोर्टात सेटिंग केल्यामुळे हा निकाल अर्जुनच्या विरोधात जातो. महिपत आणि साक्षी शिखरे आश्रम पाडण्याची तयारी करू लागतात.

हेही वाचा : “अखेर मला उत्तर मिळालं…”, होणाऱ्या नवऱ्यासह अंकिताने घेतले महेश मांजरेकरांचे आशीर्वाद, ‘तो’ Video चर्चेत

आपल्या आश्रमावर ( Tharla Tar Mag ) बुलडोझर फिरणार हे पाहून सायली प्रचंड भावुक होते. ती ढसाढसा रडू लागते. तिला काय करावं हे सुचत नसतं. महिपतसमोर हात जोडून “आमचं आश्रम पाडू नका, आमचं घर तोडू नका प्लीज…” अशी विनंती सायली करत असते. शेवटी सायली पूर्णपणे हतबल होते. तिच्याबरोबर असलेली कुसूम सायलीला सावरण्याचा प्रयत्न करते. एवढ्यात घटनास्थळी अर्जुनची एन्ट्री होते.

अर्जुनमुळे वाचणार सायलीचं वात्सल्य आश्रम

अर्जुन वेळीच येतो आणि म्हणतो थांबा…! त्याच्या येण्याने सगळेजण सावध होतात. पुढे तो म्हणतो, “कोर्टाची स्टे ऑर्डर आहे माझ्याकडे… आता तू या आश्रमाला धक्का काय हात सुद्धा लावू शकणार नाहीस महिपत शिखरे” अर्जुनला पाहून सायलीला रडू अनावर होतं. ती पटकन जाऊन नवऱ्याला मिठी मारते. त्यामुळे अर्जुनच्या सगळ्या प्रयत्नांना अखेर यश मिळून सायलीचं वात्सल्य आश्रम ( Tharla Tar Mag ) जमीनदोस्त होण्यापासून वाचणार आहे.

हेही वाचा : Salim Khan: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांवर सलमान खानचे वडील सलीम खान यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेचा हा महाएपिसोड येच्या २० ऑक्टोबरला प्रसारित केला जाणार आहे. प्रेक्षकांना दुपारी १ आणि सायंकाळी ६ वाजता हा महाएपिसोड ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag mahipat tried to demolish ashram arjun gave him stay order watch promo sva 00