‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना सध्या कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे महिपत आणि साक्षी शिखरे विरोधात अर्जुन भक्कम पुरावे गोळा करून मधुभाऊंना सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं. तर दुसरीकडे, सुभेदारांच्या घरी कल्पना अर्जुन-सायलीचं नातं आणखी घट्ट करण्यासाठी काहीतरी खास करायचं ठरवते. आता मालिकेत पुढे काय घडणार? जाणून घेऊयात…

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन गेल्या काही दिवसांपासून वात्सल्य आश्रमाच्या केससंदर्भातील पुरावे शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. मधुभाऊंची तुरुंगातून सुटता व्हावी आणि सायलीला तिच्या खऱ्या आई-बाबांबद्दल माहिती मिळावी हा अर्जुनचा मूळ हेतू असतो. हा सगळा शोध घेत असताना त्याला महिपत आणि साक्षी शिखरे विरोधात अनेक पुरावे सापडतात. परंतु, ऐनवेळी रविराज किल्लेदारांनी खोटा साक्षीदार उभा केल्याने अर्जुनची कोंडी होते. तरीही कुसूम ताईंच्या मदतीने अर्जुन कोर्टात भक्कमपणे मधुभाऊंची बाजू मांडतो.

हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता-विकीच्या नात्यावर अभिनेत्रीच्या जाऊबाईंनी दिली प्रतिक्रिया, सलमान खानला म्हणाल्या, “दोघंही आगाऊपणे…”

मालिकेत एकीकडे कोर्टाची लढाई सुरू असताना, दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता लवकरच सायलीच्या लाडक्या सासूबाई कल्पना तिला हनिमूनचं सरप्राईज देणार आहे. सुभेदार कुटुंबीय एकत्र जेवताना कल्पना सर्वांसमोर अर्जुन-सायलीला त्यांच्या हनिमूनच्या सरप्राईजबद्दल सांगते. दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने कल्पनाचा हनिमूनसाठीचा उत्साह पाहून अर्जुन-सायलीला मोठा धक्का बसतो. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “एकमेकांचा आदर नाही, चेष्टा करणं…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ मुद्द्यावर पुष्कर जोगने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या हनिमून सीक्वेन्सचं शूटिंग माथेरानमध्ये होणार आहे. सायली-अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरी आणि अमित भानुशालीचे माथेरानमधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सायली-अर्जुन हनिमूनला गेल्यावर मालिकेत नवीन ट्विस्ट काय येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader