सध्या मालिकाविश्वात ‘ठरलं तर मग’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या मालिकेला मिळताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘ठरलं तर मग’ टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर कायम टिकून आहे. या आठवड्यात या मालिकेने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी एकच जल्लोष केला आहे. याचा व्हिडीओ जुई गडकरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: अविनाश नारकरांच्या ‘या’ डायलॉगने वेधलं सगळ्यांचं लक्ष; पालक अन् मुलांविषयी म्हणाले….
काही दिवसांपूर्वी मालिकेत अनंत चतुर्थीच्या दिवशी महिपत आणि नागराजने पाठवलेल्या गुंड सायलीवर हल्ला करतात. यामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सायली बेशुद्ध पडते. पण सुदैवाने याकडे अर्जुनचं लक्ष जात आणि तो जीवाच रान करून सायलीला रुग्णालयात दाखल करतो. तिची प्रकृती गंभीर होते. तिला ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाची आवश्यकता असते. पण सुभेदार कुटुंबातील कोणाचाही रक्तगट सायलीच्या रक्तगटाशी जुळत नाही. त्यामुळे अर्जुन हताश होऊन देवाकडे सायलीचा जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करतो. अशावेळी सायली म्हणजेच तन्वीची खरी आई प्रतिमाला कुसुम उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येते.
प्रतिमा आणि सायलीचा रक्तगट एकच असतो. त्यामुळे प्रतिमा सायलीला रक्त देते. सायली शुद्धीवर येते. हे पाहून अर्जुनचे डोळे पाणवतात. पण या हल्ल्यामुळे आता अर्जुन-सायलीचं नात आणखी दृढ होताना दिसत आहे. शिवाय दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नात्यावर परिणाम होताना पाहायला मिळत आहे.
सायलीवरील या हल्ल्याचा ट्वीस्ट आता मालिकेला चांगलाच फायद्याचा ठरला आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेने रेकॉर्डब्रेक टीआरपी केला आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत प्रथम स्थानावर होती. पण टीआरपीचा ७ हा आकडा पार होत नव्हता. या आठवड्यात टीआरपीचा ७ हा आकडा पार करून थेट ७.४चा टीआरपी ‘ठरलं तर मग’ या मालिकेने मिळवला आहे. रेकॉर्डब्रेक टीआरपी केल्यामुळे संपूर्ण मालिकेच्या टीमने एकच जल्लोष केला. याचा व्हिडीओ जुईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत जुईने लिहीलं आहे, “जी टीम एकत्र क्षण साजरे करते ती कायम एकत्र राहते. आज आम्ही ७.४ पर्यंत पोहोचलो आहोत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. देनेवाल जब भी देता है, देता छप्पर फाडके..अभिनंदन टीम”
हेही वाचा – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून घ्या…
जुईच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिषेक राहळकर, केतकी विलास यांसारख्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.