Tharla Tar Mag Marathi Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामागे एक खास कारण आहे…ते कारण म्हणजे प्रतिमाची एन्ट्री! ‘ठरलं तर मग’ मालिका चालू झाल्यापासून याचं मूळ कथानक सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजशिवाय ‘प्रतिमा’ या पात्राभोवती फिरत आहे. मालिकेत किल्लेदार कुटुंबीयांचा अपघात झाल्यापासून प्रतिमा या सगळ्यांपासून दुरावलेली असते. ती ओळख बदलून दुसरीकडे राहत असते. परंतु, सायलीला प्रतिमा जिवंत असल्याची खात्री पटते आणि ती शोधाशोध करण्यास सुरुवात करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली हीच खरी तन्वी आणि प्रतिमा-रविराज किल्लेदारांची मुलगी असते. तिच्या पायावर याची खूण देखील असते. परंतु, हे सत्य प्रतिमा व मालिकेतील खलनायकांना सोडून इतर कोणालाही माहिती नसतं. पूर्णा आजी व सुभेदार कुटुंबीयांच्या आनंदासाठी सायली प्रतिमा आत्यांना शोधण्याचा निर्णय घेते. प्रतिमाला शोधण्यासाठी सायली एकटी अलिबागला जाते. दुसरीकडे, सुभेदार सायलीचा शोध घेत असतात…पोलिसांत तक्रार करायचं ठरवतात. इतक्यात घराच्या दरवाजात सायली प्रतिमाला घेऊन येते.

हेही वाचा : दीड वर्षांची राहा कपूर आत्याला ‘या’ नावाने मारते हाक! आलिया – रणबीरची लेक कोणासारखी दिसते? रिद्धिमा म्हणते…

‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच…

महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाची वाचा गेलेली असते. त्यामुळे प्रतिमा सायलीला तिची ओळख ‘कविता’ अशी सांगते. पण, सायली काहीच न ऐकता देवीआईची प्रार्थना करून प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन जाते. प्रतिमा चेहऱ्यावरील खूणा झाकून सायलीच्या मागोमाग सुभेदारांच्या घरात प्रवेश करते. पूर्णा आजी या पाहुण्या कोण आहेत? असं सायलीला विचारते. यावर सायली या पाहुण्या नसून बघा कोण आहे असं म्हणते. सायली प्रतिमाला चेहऱ्यावरची ओढणी दूर करण्याची विनंती करते.

प्रतिमाने चेहऱ्यावरची ओढणी बाजूला केल्यावर सुभेदारांच्या पायाखालची जमीन सरकते. प्रतिमाला पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. पूर्णा आजी जोरात “प्रतिमा…” असं ओरडते अन् लाडक्या लेकीला एवढ्या वर्षांनी समोर पाहून तिला अश्रू अनावर होतात. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “गणबाई मोगरा गणाची साडी…”, मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

सुभेदारांच्या घरात पोहोचली प्रतिमा ( Tharla Tar Mag )

पुढे काय घडणार? ( Tharla Tar Mag )

प्रतिमाच्या येण्याने मालिकेत ( Tharla Tar Mag ) मोठा ट्विस्ट आला आहे. पण, या सगळ्यात प्रतिमा तिची खरी ओळख सुभेदारांसमोर मान्य करणार का? की तिचं नाव ‘कविता’ आहे असं सांगून घरातून निघून जाणार? याकडे आता सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. आपली बायको जिवंत असल्याचं सत्य किल्लेदारांना समजताच त्यांची प्रतिक्रिया काय असेल? या सगळ्याचा मधुभाऊंच्या केसवर कसा परिणाम होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag marathi serial updates today episode pratima entry in subhedar house watch promo sva 00