Tharla Tar Mag Fame Actress Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेने गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेत अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच अस्मिची भूमिका अभिनेत्री मोनिका दबडेने साकारली आहे. खऱ्या आयुष्यात मोनिका लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ती आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. नुकताच अभिनेत्रीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला.

मोनिका दबडेचं डोहाळेजेवण ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर पार पडलं. तिच्या डोहाळेजेवणासाठी सेटवर सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. याशिवाय मालिकेतल्या सगळ्या अभिनेत्रींनी ऑफस्क्रीन एकत्र येऊन या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात धमाल केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याचे अनेक Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : व्हिलन ‘दौलत’ ते आदर्श मुलगा ‘अधिपती’…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका कशी मिळाली? हृषिकेश शेलार म्हणाला…

जुई गडकरी, ज्योती चांदेकर, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, श्रद्धा केतकर, दिना दानडे, मयुरी मोहिते, केतकी पालव अशा ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या सगळ्या अभिनेत्री मोनिकाच्या डोहाळेजेवणासाठी एकत्र जमल्या होत्या होत्या. यांनी तिचं स्वागत करताना सुंदर डान्स केले. अभिनेत्री आई होणार असल्याने तिचे सगळे लाड पुरवून कौतुक केलं. मोनिकाला तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

मोनिकाने डोहाळेजेवणासाठी सुंदर अशी साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. यावर फुलांचे दागिने, साडीवर ‘आई’ नाव लिहिलेला बॅच, हातात फुलांची परडी या लूकमध्ये मोनिका खूपच सुंदर दिसत होती. मोनिका व तिच्या पतीने या कार्यक्रमात एकमेकांसाठी खास उखाणे घेतले.

हेही वाचा : Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

अभिनेत्रीचा पती चिन्मय कुलकर्णी उखाणा घेत म्हणतो, “मोनिकाच्या डोहाळेजेवणाला कौतुकाने जमली मंडळी सारी, मोनिकाचं नाव घेतो.. घास भरवतो श्रीखंड आणि पुरी.” यावर मोनिका उखाणा घेत म्हणते, “चिन्मय रावांची हातची खाल्ली श्रीखंडी पुरी. अशीच आयुष्यभर साथ दे… कधीच ठेऊ नकोस दुरी.”

हेही वाचा : ‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट

दरम्यान, मोनिका दबडेच्या डोहाळे जेवणाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एप्रिल २०२५ मध्ये हे मोनिका व चिन्मय आपल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

Story img Loader