स्टार प्रवाह या वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी असणारी मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत लवकरच महिपत आणि साक्षी यांच्या गुन्ह्यांचा पाढा वाचला जाणार आहे. अर्जुननं चार हात करीत सायलीला महिपतच्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं आणि घरी परत आणलं. आता दोघे महिपत आणि साक्षी यांच्याविरोधात पुरावे गोळा करतायत याचा सीक्वेन्स सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली अर्जुनला संतोषदादाने दिलेल्या पेन ड्राइव्हबद्दल सांगते. या पेन ड्राइव्हमध्ये महिपतविरोधात पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंग्स असतात. ते शोधायला दोघंही साक्षी आणि चैतन्यचा पाठलाग करतात. चैतन्यच्या बॅगेमधून लवकरच पेन ड्राइव्ह शोधून अर्जुन महिपतचं सत्य जगासमोर उघड करणार आहे.

हेही वाचा… ‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ गाण्यावर थिरकले वैभव मांगले, भार्गवी चिरमुलेसह मराठी कलाकार; VIDEO व्हायरल

नवीन आलेल्या प्रोमोमध्ये सोमवारच्या (२५ मार्च) भागात अर्जुनच्या वडिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्याविरुद्ध न्यायालय सुनावणी घेणार आहे. या भागात अर्जुन, सायली, सुभेदार कुटुंब आणि महिपत, साक्षी न्यायालयात हजर झालेले पाहायला मिळतील. न्यायाधीश न्यायालयात सुनावणीच्या वेळी म्हणतात, “महिपत शिखरे यांना अमली पदार्थांची तस्करी या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा सुनावत आहे.” या सुनावणीनंतर पोलीस महिपतला बेड्या घालतात आणि अटक करतात.

अर्जुनच्या वडिलांवरचा गुन्हा सून सायलीने खोडून काढला आणि खऱ्या गुन्हेगारांचा चेहरा जगासमोर आणल्यानं प्रताप सुभेदारांनी मनोमन सायलीचे आभार मानले. “सुभेदारांची सून म्हणून नावाला जागली ही मुलगी, थॅंक यू सायली!”, असं सायलीचे सासरे म्हणजेच प्रताप सुभेदार म्हणताना दिसतायत.

हेही वाचा… अनुष्का शर्मा लेक अकायबरोबर भारतात परतणार? IPL मध्ये पती विराटला करणार सपोर्ट

एकीकडे महिपतला शिक्षा झाली आहे आणि सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. आता तरी पूर्णाआजी सायलीला स्वीकारेल का? महिपतनंतर साक्षीचा गुन्हा कधी उघडकीस येईल? प्रियाचं खर रूप सुभेदार कुटुंबासमोर येईल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag new episode promo sayali arjun found proof against mahipat got arrested dvr