‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला थोडेचं दिवस शिल्लक आहेत असा सीक्वेल चालू आहे. जे कॉन्ट्रॅक्ट मधुभाऊंची जेलमधून सुटका करण्यासाठी केलं होतं त्या कॉन्ट्रक्टमुळे दोघांच्याही मनात आता प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आहे. परंतु एका गैरसमजामुळे सायली-अर्जुनमध्ये दिवसेंदिवस दुरावा निर्माण होऊ लागल्याचं दिसतंय. आता हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर सायली आणि अर्जुनचं हे नातदेखील संपवणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे.
अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला दोनच दिवस शिल्लक आहे. यामुळे दोघंही त्यांच्या मनाची समजूत घालून स्वत:ला त्रास करून घेत आहेत. सायलीने अर्जुनबद्दल असलेल्या भावना तिच्या मैत्रीणीला म्हणजेच कुसुम ताईला सांगितलेल्या असतात. दोघांच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य फक्त चैतन्य आणि कुसुम ताईलाच माहित असतं. त्यामुळे सायलीला होणारा त्रास पाहून कुसुम ताई अर्जुनकडून एक वचन घेते. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा त्रास सायलीला होणार नाही याची काळजी अर्जुनला घ्यायला सांगते. अशातच दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुभेदार कुटुंब दोघांना सरप्राईज देतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी सगळे खास तयारी करतात आणि केक घेऊन येतात. हे पाहून अर्थात दोघांना आनंद होतो. पण लग्नाला एक वर्ष झालं म्हणजे लवकरच त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजदेखील संपणार याचं टेन्शन दोघांना असतं.
नव्या आलेल्या प्रोमोमध्ये सायली अर्जुनला पुन्हा एकदा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टची आठवण करून देते. अर्जुन-सायली ऑफिसमध्ये भेटतात तेव्हा अर्जुन सायलीला त्यांच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल देत म्हणतो, “आपलं कॉन्ट्रॅ्क्ट”
सायली कॉन्ट्रॅक्टकडे एक नजर टाकते आणि म्हणते, “आता निर्णय घ्यायची वेळ आलीय. आपल्या हातात शेवटचे ४८ तास आहेत. त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपतंय. ” हे ऐकताच अर्जुन निराश होतो.
हेही वाचा… VIDEO: “१४ लोकं मृत पावले अन् ही…”, मनारा चोप्राच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त, म्हणाले…
तेवढ्यात अर्जुनच्या ऑफिसमध्ये घाईगडबडीत चैतन्य येतो. त्याच्याकडे महिपतविरोधात काही महत्वाचे पुरावे असतात. ऑफिसमध्ये येताच चैतन्य अर्जुन आणि सायलीला म्हणतो, “माझ्याकडे एक खूप मोठी बातमी आहे. जेलमध्ये महिपतकडे मोबाईल आहे. महिपत मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता.” हे ऐकताच सायली आणि अर्जुनला आश्चर्याचा धक्का बसतो.
हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल
दरम्यान, मधुभाऊंची जेलमधून सुटका होणार का? सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर दोघं खरंच वेगळे होणार का? पुढे या नात्याला काय वळण येईल? हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.