Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. पण, ऐनवेळी सायली म्हणजेच खरी तन्वी लग्नमंडपात एन्ट्री घेऊन आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मालिकेत पुढे काय घडणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्जुन प्रियाला मंगळसूत्र घालताना सायली याठिकाणी येते… हा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. आता सायली आल्यावर लग्नाच्या मांडवात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठरलं तर मग’ मालिका आता ८:३० ऐवजी रोज रात्री ८:१५ ते ९:०० या वेळेत प्रसारित केली जाते. गेल्या दोन आठवड्यापासून ‘ठरलं तर मग’ मालिकेचा टीआरपी आधीपेक्षा कमी होऊन ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता टीआरपीचा पहिला क्रमांक पुन्हा एकदा मिळवण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेची संपूर्ण टीम जोरदार प्रयत्न करत आहे. टीआरपीमध्ये मालिका दुसऱ्या स्थानावर आली असली तरीही, युट्यूबवर सध्या ‘ठरलं तर मग’ची चर्चा चालू असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन-प्रियाचं लग्न सुरू असताना सायली अचानक लग्नमंडपात येते हा प्रोमो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने युट्यूबवर मंगळवारी सकाळी शेअर केला आणि अवघ्या ८ तासांमध्ये हा प्रोमो सर्वत्र व्हायरल झाला. सध्याच्या घडीला हा प्रोमो पहिल्या स्थानावर ट्रेंड करत आहे. युट्यूबसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मालिकेचा प्रोमो पहिल्या स्थानी ट्रेंड होणं ही संपूर्ण टीमसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच सर्वच कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

जुई गडकरीने हा प्रोमो पहिल्या स्थानावर ट्रेंड होत असल्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय अभिनेत्रीने संपूर्ण टीमचे या पोस्टमध्ये आभार मानले आहेत. ८ तासांमध्ये हा व्हिडीओ पहिल्या स्थानी येऊन युट्यूबवर ट्रेंड होत असल्याचं अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये जुईसह दिग्दर्शक सचिन गोखले, चैतन्य, प्रतिक सुरेश, मयुरी मोहिते, मोनिका दबाडे, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, दिशा दानडे या सगळ्या कलाकारांना टॅग करण्यात आलं आहे.

Tharla Tar Mag

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता अर्जुन आणि सायलीचं लग्न नेमकं कसं आणि कुठे होणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.