Tharala Tar Mag Marathi Serial Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका व्हावी अन् आश्रम केस प्रकरणाचे पुरावे मिळावेत यासाठी अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करण्याचा निर्णय घेतो. मधुभाऊंची सुटका व्हावी यासाठी सायली सुद्धा या नाटकात सहभागी होते. परंतु, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही आता सायली-अर्जुनच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना असल्याने या सगळ्या नाटकाचा सायलीला त्रास होऊ लागतो.

अर्जुनने प्रियाला मिठी कशी मारली, तिच्याबरोबर डान्स कसा केला हा सगळा विचार करून सायली प्रचंड अस्वस्थ होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात “मिसेस सायली तुम्हाला हे नाटक करावं लागेल नाहीतर सगळं काही संपेल, आपल्याला केसचे पुरावे मिळणार नाहीत” असं अर्जुन सायलीला ओरडून सांगतो. यावर सायली रडू लागते. बायको रडतेय म्हटल्यावर अर्जुन तिची माफी मागतो. पण, दुसरीकडे प्रियाला सुद्धा सुभेदारांची सून व्हायचं असतं. त्यामुळे ती अर्जुनच्या जाळ्यात सहज ओढली जाते.

star pravah ude ga ambe new serial launching date and time
मुहूर्त ठरला! नवरात्रोत्सवात सुरू होणार ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘उदे गं अंबे’; कोणती जुनी मालिका घेणार निरोप?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhonis record
Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
tharala tar mag sayali pratima and raviraj killedar perform Ganpati pooja
ठरलं तर मग : प्रियाचा डाव फसला! पूर्णा आजीचा ‘तो’ निर्णय अन् प्रतिमा-रविराजसह सायलीने केली बाप्पाची पूजा, पाहा प्रोमो
zee marathi savlyachi janu savali marathi serial starcast
तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
Ude Ga Ambe New Marathi Serial
‘स्टार प्रवाह’वर सुरु होणार नवी पौराणिक मालिका! देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर, तर अभिनेत्री आहे…; पाहा जबरदस्त प्रोमो
Paris Paralaympics 2024 Sheetal Devi India Armless Archer Broke World Record in Archer With Incredible 703
Paris Paralympics: हाताविना तिरंदाजी करणाऱ्या शीतल देवीची पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक सुरूवात, अवघ्या एका गुणाने हुकला विश्वविक्रम, पाहा VIDEO
Paaru
Video : दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम; कोण जिंकेल ही प्रेमाची लढाई? ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

हेही वाचा : अंबानींनी लग्नासाठी १२ जुलै तारीख का निवडली? पाहुण्यांच्या हातात गुलाबी बँड का होते? सूनबाई राधिका मर्चंट म्हणाली…

आता लवकरच प्रिया अर्जुनसाठी डिनर डेटचं प्लॅनिंग करणार आहे. या कँडल लाइट डिनर डेटवर प्रिया व अर्जुन दोघेच जातात. मधुभाऊंच्या केससाठी एवढं सगळं करण्याची काय गरज आहे याचा विचार करून सायली अर्जुनवर संतापते. मालिकेत हा ट्रॅक चालू असतानाच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच पुन्हा एकदा प्रतिमाची म्हणजे सायलीच्या आईची एन्ट्री होणार आहे.

ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेत प्रतिमाची एन्ट्री

सायली हीच खरी तन्वी आणि रविराज किल्लेदारांची मुलगी असल्याचं सत्य केवळ प्रतिमाला माहिती असतं. तर, सायली प्रतिमाला अर्जुनची आत्या म्हणून ओळखत असते. सायली-अर्जुन एकमेकांशी प्रियामुळे भांडत असताना समोरून येणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते. ती पटकन जाऊन त्या बाईला वाचवते. ही बाई दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा असते. तिने चेहरा झाकून घेतलेला असतो. परंतु, सायलीने जीव वाचवल्यावर प्रतिमा तिचे हात जोडून आभार मानते एवढ्यात सायली तिचा चेहरा पाहते.

pratima
ठरलं तर मग ( Tharala Tar Mag ) मालिकेत प्रतिमाची एन्ट्री

हेही वाचा : Video : मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा ‘शुभ आशीर्वाद’ समारंभ! व्हिडीओमध्ये दिसली झलक

Tharala Tar Mag Marathi Serial Promo

महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाचा चेहरा एका बाजूने जळलेला असतो त्यामुळे सायली तिला पटकन ओळखू शकत नाही. माघारी फिरत असताना हा चेहरा कुठेतरी पाहिलाय याची जाणीव सायलीला होते आणि ती जोरात “माई थांबा…” असा आवाज देते. सायलीने आवाज दिल्यावर प्रतिमा थांबेल का? सायली तिला ओळखू शकेल का? या सगळ्या गोष्टी २१ जुलैला प्रसारित होणाऱ्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.