छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांच एक वेगळं नातं तयार झालेलं असतं. मालिकेचं कथानक, कलाकारांचा अभिनय उत्तम असला की, प्रेक्षक आवर्जुन न चुकता ती मालिका दररोज पाहतात. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि लेखक प्रयत्न करत असतात. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होत असतो. मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपीची यादी समोर आली आहे; ज्यामधून तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, हे सिद्ध झालं आहे.

हेही वाचा – “१४ वर्ष अयशस्वी करिअर…” ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीला स्वामींची आली अशी प्रचिती, म्हणाली…

‘मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर मागील आठवड्याची ऑनलाइन टीआरपी यादी शेअर केली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही ऑनलाइन टीआरपीची यादी पोस्ट केली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे. तर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला मागे टाकतं तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका दुसऱ्या स्थानावर आली आहे. तसेच अरुंधतीची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – “…तर तुम्ही भिकेला लागाल”; ‘श्वास’ फेम अभिनेते अरुण नलावडे यांना असं कोण म्हणालं होतं?

ही ऑनलाइन टीआरपीची यादी पाहता येत्या काळात जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ आणि तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपी यादीत पहिल्या १० स्थानावर स्टार प्रवाहच्या मालिका आहेत.

हेही वाचा – “मी सात महिने घरी बसलेलो, कारण सुबोध भावे…”, चिन्मय मांडलेकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

मागील आठवड्याच्या ऑनलाइन टॉप १० मालिका

१) ठरलं तर मग
२) प्रेमाची गोष्ट
३) आई कुठे काय करते
४) सुख म्हणजे नक्की काय असतं
५) रंग माझा वेगळा
६) ठिपक्यांची रांगोळी
७) लग्नाची बेडी
८) तुझेच मी गीत गात आहे
९) मुरांबा
१०) मन धागा धागा जोडते नवा

दरम्यान, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेत तेजश्रीबरोबर राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे. या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे दाखवण्यात आलं आहे.

Story img Loader