स्टार प्रवाह या वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी असणारी मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत प्रिया पूर्णाआजीला सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगते आणि त्यामुळे पूर्णाआजी सायलीला त्यांच्या लग्नासह अर्जुनच्या प्रेमाबद्दल देवासमोर शपथ घ्यायला लावते, असा सीक्वेन्स सध्या सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली सुभेदार कुटुंबासमोर देवाच्या पुढ्यात शपथ घेऊन सांगते की, त्यांचं लग्न खरं आहे आणि तिचं अर्जुनवर मनापासून प्रेम आहे. हे ऐकताच अर्जुन खूप खूश होतो; तर प्रियाचा प्लॅन फसल्यामुळे तिची चिडचिड होते.

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल

नवीन आलेल्या प्रोमोमध्ये बुधवारच्या (८ मे) भागात सायलीने शपथ घेतल्यानंतर प्रिया साक्षीला भेटते आणि सांगते, “तिनं देवासमोर शपथ घेऊन सांगितलंय की, त्यांच लग्न खोटं नाही; खरं आहे आणि तिचं अर्जुवर प्रेमही आहे.” त्यावर साक्षी म्हणते, “सायलीनं देवाची शपथ घेऊ दे; नाही तर घसा ओरडून सांगू दे. पण, ही बातमी १००% खरी आहे की, त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे.”

हेही वाचा… वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीला संपवावंसं वाटलं होतं त्याचं आयुष्य; म्हणाला,“मी एका रात्री टेरेसवर…”

प्रियानं हे सत्य सुभेदार कुटुंबासमोर आणल्यानं चैतन्य अर्जुनला खरं सागतो की, त्यानंच ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट साक्षीला सांगितली आणि तिनं प्रियाला सांगितली. हे ऐकताच अर्जुनचा राग अनावर होतो. अर्जुन चैतन्यला ओरडतो आणि म्हणतो, “मानलं आपलं भांडण झालं होतं; पण मनातली मैत्री कायम होती ना आपली. मग तरीसुद्धा एवढी मोठी गोष्ट तू साक्षीला कशी सांगितलीस. तू असं कसं करू शकतोस. माझा विश्वास होता तुझ्यावर.”

अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकून चैतन्यला खूप वाईट वाटतं. त्यामुळे चैतन्य अर्जुनला म्हणतो, “मी नाही स्वत:ला माफ करू शकणार. मला असं वाटतंय की, मीसुद्धा कुणालसारखं काहीतरी…” परंतु, असं चैतन्यनं म्हणताच अर्जुन त्याच्या कानाखाली मारतो.

तर दुसऱ्या बाजूला सायली आनंदात असते आणि अर्जुनच्या आईला आनंदानं मिठी मारते. सायली अर्जुनच्या आईला म्हणते, “आई मला खूप छान वाटतंय म्हणजे याआधी इतक छान कधीच वाटलं नव्हतं ना इतकं छान.”

हेही वाचा… “…तुम्ही हुमा कुरेशीच्या पाया पडत होता”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “मला भरून आलं…”

एका बाजूला सायलीनं सुभेदार कुटुंबासमोर प्रियाला खोटं पाडून त्यांच्या लग्नाचं खोटं कसबसं लपवलं आहे आणि नकळत का होईना सायलीनं तिच्या मनातल्या खऱ्याखुऱ्या भावना सगळ्यांसमोर मनमोकळेपणानं व्यक्त केल्या.

आता सायलीच्या भावना सगळ्यांसमोर आल्यात म्हटल्यानंर अर्जुन त्याचं प्रेम सायलीसमोर व्यक्त करू शकेल का? या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर खऱ्या लग्नात होईल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag promo arjun slaps chaitanya for telling sakshi about contract marriage dvr