‘ठरलं तर मग’ ही मालिका अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेला महामलिकेचा सन्मान मिळाला आहे. टीआरपीमध्ये आघाडीवर असणारी ही मालिका आताच्या घडीला एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
या मालिकेमध्ये सध्या प्रिया ऊर्फ तन्वीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अशा परिस्थितीत तिने कसातरी स्वत:चा जीव वाचवला. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सायली त्याला दिवसातून फक्त दोनदा कॉफी घेण्याची परवानगी देते, असा सीक्वेन्स सध्या सुरू आहे.
हेही वाचा… शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रकृतीबद्दल दिली अपडेट; लेक सोनाक्षीचं नाव घेत म्हणाले, “हे सगळं तिने…”
महिपत, साक्षी व नागराज प्रियाला यापुढील त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होण्यास मनाई करतात. तिघं एकत्र मिळून तिला एकटं टाकतात. त्यामुळे प्रिया त्यांना त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणेन, अशी धमकी देते. ही गोष्ट घडल्यानंतरच अचानक प्रियावर हल्ला होतो आणि ती कशीबशी या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करते. तिच्यावर झालेला हा हल्ला साक्षी, महिपतच्या माणसांनी केलाय हे प्रियाला कळतं. अशातच आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये तन्वी तिच्या घरातून गायब झाली आहे आणि त्यामुळे रविराज टेन्शनमध्ये येऊन, तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करतो. “तन्वी आली आहे का तिकडे? तिचा काही फोन किंवा मेसेज आला होता का तुला?”, असं रविराज तन्वीच्या मैत्रिणीला विचारतो. पण, सानिकालादेखील (तन्वीची मैत्रीण) तन्वीबद्दल काहीच माहीत नसतं.”
तेवढ्यात अर्जुनला तन्वीचा मेसेज येतो. मेसेज बघताच अर्जुन सगळ्यांना बोलावतो आणि म्हणतो, “तन्वीचा मेसेज आलाय मला. तिनं मला व्हिडीओ पाठवलाय.” तो व्हिडीओ सायली, चैतन्य, अश्विनव कल्पना बघतात आणि बघताच क्षणी त्यांना धक्का बसतो. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, “हे अविश्वसनीय आहे.” तेवढ्यात सायली अर्जुनला विचारते, “हे रविराजसरांना माहीत असेल का?” हे ऐकताच अर्जुन रविराजला फोन करतो आणि विचारतो, “हॅलो सीनियर, तन्वी कुठे आहे?”
हेही वाचा… “एवढा कुरूप चेहरा…”, ‘या’ अभिनेत्याने सांगितला बॉलीवूड इंडस्ट्रीतला वाईट अनुभव, म्हणाला…
तन्वीला महिपत, साक्षी व नागराजने गायब केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यादरम्यान तन्वी नक्की कुठे असेल? आणि तन्वीने अर्जुनला नक्की कोणता व्हिडीओ पाठवलाय; जो बघून सुभेदार कुटुंबाला धक्का बसलाय. हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.